वेंगुर्लेत अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई

३१ हजार ६०० मुद्देमाल जप्त

*⚡वेंगुर्ला दि.११-:* तालुक्यात पोलिसांनी गस्ती दरम्यान तापसणी करताना तीन अवैध गोवा बनावटीच्या दारूवर मंगळवारी (१० ऑगस्ट) कारवाई केली यात सुमारे ३१ हजार ६०० रुपयांच्या गोवा बनावटी दारू सहित दोन दुचाकी वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून 3 दुचाकी स्वरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सातार्डा शिरोडा मार्गे अणसुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तपासणी करताना अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना या तिन्ही कारवाया करण्यात आल्या. यातील पहिल्या कारवाईत दुचाकीस्वार स्टँडली मोतेस फर्नांडिस याच्याकडील ६४०० रुपयांची दारू ताब्यात घेण्यात आली तर यादरम्यान स्टॅंडली याने पलायन केल्याने तो फरार आहे. तसेच सातार्डा ख्रिश्चनवाडी येथील क्लाइन कमिलो फर्नांडिस (२०) याच्या ताब्यातील १२ हजार ८०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारू सहित सुमारे ३५ हजार किमतीची दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. तर गोवा पेडणे येथील जुवाव गरबियान फर्नांडिस (२९) हा याच मार्गाने १२ हजार ४०० रुपयांची दारू वाहतूक करत असताना कारवाई करण्यात आली असून याच्या ताब्यातील सुमारे ४० हजार किमतीची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या तिन्ही कारवाई मधील दुचाकीस्वारांवर गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत व अमर कांडर यांनी या कारवाया केल्या आहेत.

You cannot copy content of this page