विनामास्क आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यावर दंडात्मक कारवाई
*⚡सावंतवाडी ता.११-:* शहरात पोलिसांनी आज सायंकाळी अचानक नाकाबंदी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. स्वतः पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी मैदानात उतरून विनामास्क फिरणाऱ्यावर तसेच हॉटेल व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान यापुढे नियम न पाळल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा ही निरीक्षकांनी दिला आहे. यावेळी वाहतूक पोलीस सखाराम भोई, प्रवीण सापळे, महेश जाधव, , भूषण भोवर आदी उपस्थित होते
