जिल्ह्यात आज आणखी ४७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४७ हजार ४३५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ६७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

मालवण येथील मोहन सायकल स्टोअर्स चे मालक मोहन मांजरेकर यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील मोहन सायकल स्टोअर्सचे मालक व वायरी येथील रहिवासी मोहन विश्राम मांजरेकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी मेन रोड शाखा मालवणचे वरिष्ठ शाखाधिकारी नित्यानंद उर्फ नितीन मांजरेकर व क्रिकेटपटू शेखर मांजरेकर यांचे…

Read More

तारकर्ली ग्रामपंचायतीच्या कचरा वाहक गाडीचे लोकार्पण

*⚡मालवण ता.२३-:* तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामनिधीमधून तारकर्ली गावासाठी कचरा वाहक गाडी खरेदी करण्यात आली असून या गाडीचे लोकार्पण विश्वनाथ मोंडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. पर्यटन गाव असलेल्या तारकर्ली गावात कचऱ्याची समस्याही निर्माण होत असल्याने या कचरा वाहक गाडीने गावातील वाड्यांमधील तसेच समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचल करणे शक्य होणार असून…

Read More

केणीवाड्यातील स्ट्रीट लाइट चार दिवसांत सुरू करा

अन्यथा आंदोलन छेडणार : भाजपचे काका परब यांचा इशारा *⚡बांदा दि.२३-:* पाडलोस केणीवाडा येथील स्ट्रीट लाइट गेले चार महिने बंद अवस्थेत आहे. तौक्ते चक्रिवादळानंतर ते आजतगायत रस्त्यावरील स्ट्रिट लाईट बंद असल्यामुळे त्या दरम्यानचा वीज कर आकारू नये. येत्या चार दिवसांत केणीवाडा स्ट्रीट लाईट सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, युवामोर्चा सावंतवाडी तालुका सरचिटणीस काका…

Read More

शिक्षकांना कोरोना ड्युटीतून वगळा

माध्यमिक शिक्षक भारतीचे साखळी उपोषण सुरू सिंधुदुर्गनगरी ता २३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड ड्युटी तून मुक्त करून शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी शिक्षक भारतीने आज पुन्हा एकदा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडले. शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आपल्या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी…

Read More

अपर जिल्हाधिकारी हटावसाठी मनसेचा लक्षवेधी मोर्चा

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना दिले निवेदन *⚡ओरोस दि.२३-:* “अप्पर जिल्हाधिकारी हटाव , पर्यावरण बचाव”अश्या घोषणा देत मनसेने सिडकोभवन ओरोस येथून जिल्हाधिकारी कार्यालयालापर्यंत मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकारी याना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर मोर्च्याला संबोधित करताना मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर म्हणाले, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत जेवढे जमिन निवाडे झालेले आहेत , त्यांची चौकशी व्हावी. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य…

Read More

कलमठ सरपंचपदाची निवडणूकीकडे लक्ष

भाजप शिवसेनेत सरपंचपदासाठी रस्सीखेच होणार *⚡कणकवली दि.२३-:* राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत असलेल्या कणकवली शहरालगत असलेल्या कलमठ ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा आमने-सामने ठाकणार असून 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीत कलमठ सरपंचपदी कोण विराजमान होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान स्थितीत कलमठ ग्रामपंचायतीत भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने भाजपचा सरपंच होणार असल्याचे मानले…

Read More

निवृत्त कर्मचाऱ्यांबाबत प्रशासन चुकीचे निर्देश का देते…?

व्याजाची मागणी करणार नाही असे हमीपत्र घेणेच चुकीचे:सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा सवाल *⚡कणकवली दि.२३-:* सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाकडून व्याजाची मागणी करणार नाही असे हमीपत्र घेणेच पूर्णत : चुकीचे असून सुद्धा ते ऐच्छिक आहे असे कळविणे यालाही शिक्षक प्रतिनिधीचा पूर्ण विरोध आहे . निवृत्त होणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याने आपल्या देय रकमा संबंधात अशा कोणत्याही प्रकारचे हमीपत्र देऊ नये ….

Read More

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा वाहतुकदृष्टीने धोकादायक

काही बरेवाईट घडले तर जबाबदार कोण?;राजेंद्र पेडणेकर यांचा सवाल *⚡कणकवली ता.२३-:* मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराजांचा पुतळा सर्व्हिस रोडच्या अगदी मधोमध असल्याने, पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक चालू आहे, आज कणकवली शहर झपाट्याने वाढतय, त्यामुळे साहजिकच वाहतूक हि वाढणे आलेच, या पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक होत असलेल्याने समजा भविष्यात…

Read More

सबनीसवाडा प्रभागात ५ दिवस स्ट्रीटलाईट बंद असल्याने हाल

नगरसेविका दिपाली सावंत आक्रमक; उपकार्यकारी अभियंत्यांना विचारला जाब *⚡सावंतवाडी ता.२३-:* सबनीस वाडा प्रभाग क्रमांक २ मध्ये गेले ५ दिवस स्ट्रीट लाईट बंद असल्याने, तेथील नागरिकांचे हाल होत आहेत. तक्रार देऊनही तक्रार दिली नाही. असे अधिकारी सांगत असल्याचा आरोप नगरसेविका सौ दिपाली सावंत यांनी आक्रमक होत सावंतवाडी विद्युत कार्यालयात येत उपकार्यकारी अभियंता श्री. एस भुरे यांना…

Read More
You cannot copy content of this page