नगरसेविका दिपाली सावंत आक्रमक; उपकार्यकारी अभियंत्यांना विचारला जाब
*⚡सावंतवाडी ता.२३-:* सबनीस वाडा प्रभाग क्रमांक २ मध्ये गेले ५ दिवस स्ट्रीट लाईट बंद असल्याने, तेथील नागरिकांचे हाल होत आहेत. तक्रार देऊनही तक्रार दिली नाही. असे अधिकारी सांगत असल्याचा आरोप नगरसेविका सौ दिपाली सावंत यांनी आक्रमक होत सावंतवाडी विद्युत कार्यालयात येत उपकार्यकारी अभियंता श्री. एस भुरे यांना जाब विचारला आहे. यावेळी तक्रार नोंद वही चेक केली असता, तक्रार दाखल केल्याचे दिसून आले. परंतु, ती तक्रार सोडवली असल्याचा शेरा तिथे मारण्यात आला आहे. तरी देखील लाईट का आली नाही. असा जाब विचारत महावितरण मध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यानी केला आहे. यावेळी दोन दिवसात ही समस्या दूर न केल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा ही त्यानी दिला आहे.
