कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा वाहतुकदृष्टीने धोकादायक

काही बरेवाईट घडले तर जबाबदार कोण?;राजेंद्र पेडणेकर यांचा सवाल

*⚡कणकवली ता.२३-:* मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराजांचा पुतळा सर्व्हिस रोडच्या अगदी मधोमध असल्याने, पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक चालू आहे, आज कणकवली शहर झपाट्याने वाढतय, त्यामुळे साहजिकच वाहतूक हि वाढणे आलेच, या पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक होत असलेल्याने समजा भविष्यात काही बरेवाईट घडले तर त्याला जबाबदार कोण?असा सवाल कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. राजेंद्र मनोहर पेडणेकर म्हणतात,श्री. गणेश चतुर्थी उत्सव जवळ आला आहे, या दरम्यान वाहतूक हि वाढणार आहे, प्रत्येक जण घरी पोहोचवण्याच्या घाईत असणार, रात्री अपरात्री प्रवास जनता करणार आहे, या घाईगडबडीत चालकाला झोप अणावर झाली तर….. आणि पुतळ्याला धडक लागली तर…… पुतळ्याचे नुकसान झाले तर…… तसेच वाहनातील प्रवास करणाऱ्यांच्या जीवितास काही धोका उत्पन्न झाला तर……. या आणि अशा अनेक प्रश्नावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, याचे कारण असे कि हा विषय आजच्या घडीला प्रत्येकाने हातात घेणे आवश्यक आहे, तसे झालेही परंतु याला राजकिय स्वरूप निर्माण झाले, पण इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटतेय ती म्हणजे प्रत्येकाने छत्रपतींवरील वरील प्रेमापोटीच आपल्या परीने हे सर्व करण्याचा पर्यत केला, पण आता अशी वेळ आली आहे कि, सर्वानीच म्हणजे प्रत्येक नागरिकांनी यासाठी आपले योगदान देण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य स्थळी कसा डौलाने ऊभा करता येईल ते करुया! असेही सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page