शिवउद्यानातील मेळ्यात शहरातील मतदारांच्या मुलांना मोफत प्रवेश द्यावा…

राजू कासकर यांची मागणी: मनसेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन केले सादर..

⚡सावंतवाडी ता.०८- : सावंतवाडी येथील शिवउद्यानात सुरू असलेल्या मेळ्यात सावंतवाडी शहरातील मतदारांच्या बारा वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष राजू कासकर यांनी आहे. याबाबतचे निवेदन सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

मनसेचे शहराध्यक्ष अॅड. राजू श्रीकांत कासारकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवउद्यान हे नगरपालिकेने स्थानिकांकडून येणाऱ्या करातून उभारले असून त्याचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी न होता शहरातील लहान मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी व्हावा. उद्यानामुळे हवा शुद्धीकरण, तापमान नियंत्रण तसेच ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
मात्र सध्या शिवउद्यानात भरविण्यात आलेल्या मेळ्यामुळे परिसरातील शांतता भंग होत असून मोठ्या आवाजामुळे नागरिक त्रस्त असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच मेळ्यातील विविध खेळांचा खर्च सर्वसामान्य व गरीब पालकांना परवडणारा नसल्याने शहरातील मतदारांच्या बारा वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन अॅड. राजू श्रीकांत कासारकर, शहराध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले.

You cannot copy content of this page