मालवणात ‘गाबीत समाज’ पुस्तक भेट देऊन आमदार प्रमोद जठार यांचे केले स्वागत…

गाबीत समाजाच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठक:आम. प्रमोद जठार ..

⚡कुडाळ ता.०८-: नवनियुक्त विधानपरिषद भाजपा आमदार प्रमोद जठार यांचा प्रथमच सिंधुदुर्ग दौरा कालच सुरू झाला. यावेळी मालवण येथे गाबीत समाजाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवर यांनी ‘गाबीत समाज’ हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
गाबीत समाजाचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील समस्या या विषयात सदरचे पुस्तक मार्गदर्शक म्हणून उपयोगी येईल असे मत आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केले. तसेच सद्यस्थितीमधील समाजा संदर्भात असलेल्या समस्या आणि त्यांची सोडवणूक या विषयात लवकरच विस्तृत चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात येणार आहे असे सांगितले. आमदार प्रमोद जठार यांनी मंत्रालय स्तरावर समाज संदर्भात विषयात पाठपुरावा करावा. तसेच विधानपरिषद सभागृहचा उपयोग समस्या सोडवणूक, तसेच शासकीय योजना यांचा लाभ होण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा उपस्थित गाबीत समाजाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी केली.
यावेळी मालवण नगरपालिका गटनेत्या सौ. अन्वेषा आचरेकर, भाजपचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण चिंतामणी तोरसकर नगरसेविका सौ. दर्शना कासवकर, सौ.सेजल परब, सौ.पूजा सरकारे, सन्मेष परब,भाई कासवकर, दाजी सावजी, सुरेश बापर्डेकर, मनोज मेथर, आपा मलांडकर, खोबरेकर सर व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page