वेंगुर्ला विद्युत शहर कार्यालयाचा उत्कृष्ट शाखा म्हणून सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वीज वितरण कुडाळ विभाग अंतर्गत वेंगुर्ला शहर कार्यालयास उत्कृष्ट शाखा कार्यालय म्हणून सन्मानित करण्यात आले. कुडाळ विभाग अंतर्गत येणाऱ्या 5 तालुक्यातून एकूण 26 शाखा कार्यालयातून वेंगुर्ला शहर शाखेची 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा सन्मान बहाल करण्यात आला. रत्नागिरी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात
कोकण झोनचे मुख्य अभियंता अनिल डोहे यांच्या हस्ते वेंगुर्ला सहाय्यक अभियंता इम्रान शेख यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अन्य मान्यवर तसेच प्रधान तंत्रज्ञ वसंत बागायतकर आदी उपस्थित होते.वेंगुर्ला शाखेने २०२५-२६ या वित्तीय वर्षात वीज महसूल वसुली उद्दिष्ट प्रति आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व जनमित्र, बिलींग स्टाफ, इतर सर्व सहकारी यांच्याबरोबर उत्कृष्ट समन्वय ठेवून तसेच वीज ग्राहकांबरोबर सकारात्मक सुसंवाद साधून कोकण परिमंडल रत्नागिरी कार्यालयाचे वीज देयक वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्णत्वास नेण्यास अमुल्य योगदान दिले. सर्वाच्या कुशल सांघिक कार्यामुळे कोकण परिमंडलाने वीज देयक वसुली उद्दिष्ट प्राप्तीमध्ये सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या प्रशंसनिय कामगिरीबद्दल वेंगुर्ला शहर शाखेला उत्कृष्ट शाखा कार्यालय म्हणून निवड करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.

You cannot copy content of this page