शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या गवारेड्यांचा बंदोबस्त करा…

पांडुरंग लोंढे यांची वनविभागाकडे मागणी… *⚡दोडामार्ग ता.२६ सुमित दळवी-:* दोडामार्ग मध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या जंगली गवारेडयांचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, आता नुकसान भरपाई नको, पण बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लोंढे यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कोनाळ गावाला लागूनच असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात जंगली गवारेड्यांचा कळप आहे….

Read More

विद्यार्थ्यांच्या हजारो ग्रिटींगकार्डचे प्रदर्शन

*⚡वेंगुर्ला ता.२६-:* आकाश कंदीलच्या निर्मिती बरोबरच विद्यार्थ्यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेतोरे हायस्कूलने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला असून आकाशकंदिलासोबत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सुमारे १००० ग्रिटींग कार्डचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वनिर्मितिचा आनंद घेण्यासाठी, त्यांची जिज्ञासेतून सर्जनशीलता आणि चिकित्सक विचार क्षमता विकसित करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे श्री देवी सातेरी हायस्कूलमार्फत सांगण्यात आले.

Read More

वेंगुर्ल्यात किल्ले स्पर्धांचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.२६-:* वेंगुर्ला शिवसेना आयोजित व सचिन वालावलकर पुरस्कृत वेंगुर्ल्यामध्ये किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ व ८ नोव्हेंबर रोजी किल्ल्यांचे परिक्षण होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तिन विजेत्यांना २५००, १५००, १००० आदी रोख रक्कम व सन्मानपत्र दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Read More

अनाथ मुलांच्या मदतीसाठी शिक्षकांचा पुढाकार

दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन *⚡वेंगुर्ला ता.२६-:* कोविडमुळे वेंगुर्ला तालुक्यातील जे विद्यार्थी अनाथ झाले आहेत, त्यांना मदत करण्यासाठी वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक कलामंचने पुढाकार घेतला आहे. यासाठी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्वामिनी हॉल, पाटकर हायस्कूलजवळ, वेंगुर्ला येथे ‘भौमासूर वध‘ अर्थात ‘नरक चतुर्दशी महिमा‘ या महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकाची निर्मिती व…

Read More

कालावल आणि कर्ली खाडी पत्रात अनधिकृत वाळू उपसावर पुन्हा एकदा महसूल विभागाची कारवाई…

मालवण दि प्रतिनिधी कालावल खाडी पात्र आणि कर्ली खाडी पात्रात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर महसूल विभागाने आजही धडक कारवाई केली आज कर्ली खाडीपात्रात आंबेरी व धामापूर येथे ११ तर कालावल खाडी पात्रात चिंदर तेरई व भगवंतगड येथे ८ असे एकूण १९ दगडी रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त केले. मालवण तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशाबाबत…

Read More

रापण व्यवसायिकांनी मानले माजी खासदार निलेश राणे यांचे आभार

*⚡मालवण ता.२५-:* क्यार वादळात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारकडून जाहीर झालेल्या सानुग्रह अनुदानापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रापण व्यावसायिक वंचित राहिले होते. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाकडे पाठपुरावा करून मदतीपासून वंचित राहिलेल्या या रापण व्यवसायिकांना अनुदानाची रक्कम मिळवून दिल्याबद्दल माजी खासदार निलेश राणे यांची रापण व्यावसायिकांनी भेट घेत त्यांचे आभार मानले. क्यार वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील रापण…

Read More

आचरा येथे कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर संपन्न

*⚡मालवण ता.२५-:* अन्याय होत असेल तर प्रत्येकाला न्यायालयात न्याय  मिळू शकतो. आज आपल्याला लोकन्यायालयाच्या माध्यमातून कुठचाही प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने तडजोडीने सोडवता येऊ शकतो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक नागरिकांने कायद्याची भीती न बाळगता कायदा  जाणून घ्यावा असे प्रतिपादन मालवणचे दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, मालवणचे श्री.बी. बी. चौहान यांनी येथे बोलताना केले. गावातील जुनी…

Read More

अंशकालीन स्त्री परिचर संघटनेचे सभापतींना निवेदन

समस्या सोडवीत न्याय देण्याची केली मागणी देवगड महाराष्ट्र राज्य कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत अंशकालीन स्त्री परिचरांच्या समस्या व मागण्याबाबत लेखी पत्र देवगड पंचायत समिती सभापती रवी पाळेकर यांचेकडे अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्या शिष्टमंडळाने सादर करून या मागण्याबाबत न्याय मिळावा .अशी मागणी केली . यात प्रामुख्याने अंशकालीन स्त्री परिचर याना पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सरळसेवा…

Read More

एसटी वाहक संतोष पवार यांनी दाखवला प्रामाणिकपणा…

देवगड कुवळे एसटी बस मध्ये सापडलेले पाकीट प्रवाशाला केले परत… *⚡देवगड ता.२५-:* देवगड आगारातील वाहक सेवा बजावीत असलेले वाहक संतोष कृष्णा पवार.रा.(कुवळे) हे देवगड कुवळे या प्रवासी फेरीवर सेवा बजावीत असताना गाडीत सापडलेले पाकीट त्यातील रोख रक्कम व कागदपत्रे महिला प्रवाशांच्या नातेवाईकांकडे परत करून प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल वाहक संतोष पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे….

Read More

पनवेल येथे पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कु. समर्थ प्रफुल्ल भावे याला सुवर्णपदक…

*⚡देवगड ता.२५-:* महाराष्ट्र पावर लिफ्टिंग एसोसिएशन मुंबई आयोजित पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये देवगड नारिंग्रे येथील कु.समर्थ प्रफुल्ल भावे याने सुवर्णपदक प्राप्त केले. ९३किलो सबज्युनिअर गटातून एकूण ४५२.५ वजन झेलत त्याने सुवर्ण पदक प्राप्त केले.ही स्पर्धा २४ ऑक्टोंबर रोजी पनवेल येथे पार पाडली. संपूर्ण राज्य भरातून स्पर्धकांनी पनवेल येथे सहभाग दर्शविला होता. समर्थ भावे गेले चार वर्ष…

Read More
You cannot copy content of this page