*⚡देवगड ता.२५-:* महाराष्ट्र पावर लिफ्टिंग एसोसिएशन मुंबई आयोजित पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये देवगड नारिंग्रे येथील कु.समर्थ प्रफुल्ल भावे याने सुवर्णपदक प्राप्त केले. ९३किलो सबज्युनिअर गटातून एकूण ४५२.५ वजन झेलत त्याने सुवर्ण पदक प्राप्त केले.ही स्पर्धा २४ ऑक्टोंबर रोजी पनवेल येथे पार पाडली. संपूर्ण राज्य भरातून स्पर्धकांनी पनवेल येथे सहभाग दर्शविला होता. समर्थ भावे गेले चार वर्ष पावर लिफ्टिंग चा सतत सराव करत असून महत्वकांक्षा,, जिद्द मेहनतीच्या जोरावर त्याने या पूर्वी दिल्ली येथील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्याने सिल्व्हर मेडल प्राप्त केले होते तसेच अन्य स्पर्धेतही यश मिळवले आहे. पनवेल येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्यानंतर हैदराबाद येथे होणाऱ्या नॅशनल स्तरावरील पावर लिफ्टिंग स्पर्धे मध्ये समर्थ ची निवड झाली आहे. देवगड मधील शुद्ध शाकाहारी हॉटेल प्रपंच चे मालक प्रफुल्ल भावे यांचे चिरंजीव आहेत त्यांचे सर्व स्तरातून देवगड तालुक्यातुन ति कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पनवेल येथे पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कु. समर्थ प्रफुल्ल भावे याला सुवर्णपदक…
