एसटी वाहक संतोष पवार यांनी दाखवला प्रामाणिकपणा…

देवगड कुवळे एसटी बस मध्ये सापडलेले पाकीट प्रवाशाला केले परत…

*⚡देवगड ता.२५-:* देवगड आगारातील वाहक सेवा बजावीत असलेले वाहक संतोष कृष्णा पवार.रा.(कुवळे) हे देवगड कुवळे या प्रवासी फेरीवर सेवा बजावीत असताना गाडीत सापडलेले पाकीट त्यातील रोख रक्कम व कागदपत्रे महिला प्रवाशांच्या नातेवाईकांकडे परत करून प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल वाहक संतोष पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अधिक माहिती अशी की देवगड आगारातून दु.१२.१५ वा .सुटणारी देवगड कुवळे या प्रवासी फेरीत वाहक संतोष पवार यांना एक लेडीज पर्स सापडली .त्या पर्स मध्ये महिला प्रवासी यांचे निवडणूक ओळखपत्र सापडले व रोख रक्कम रु २२७५/- आढळून आली.सदर पर्स वाहकाने स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांचे ताब्यात देऊन संबंधित महिलेशी संपर्क त्यांच्या नातेवाईकांकडे ओळख पटवून ती पर्स ताब्यात देण्यात आली. या प्रामाणिक पणा बद्दल वाहकाचे नातेवाईकांनी आभार मानून कौतुक केले.

You cannot copy content of this page