समस्या सोडवीत न्याय देण्याची केली मागणी
देवगड महाराष्ट्र राज्य कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत अंशकालीन स्त्री परिचरांच्या समस्या व मागण्याबाबत लेखी पत्र देवगड पंचायत समिती सभापती रवी पाळेकर यांचेकडे अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्या शिष्टमंडळाने सादर करून या मागण्याबाबत न्याय मिळावा .अशी मागणी केली . यात प्रामुख्याने अंशकालीन स्त्री परिचर याना पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सरळसेवा भरतीमध्ये १०% आरक्षण लागू करणे.मानधनात वाढ करणे,कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारच्या रजा लागू करणे.स्त्री परिचर गणवेश मिळावा.ओळखपत्र देण्यात यावे.रिक्त जागा भरण्यात याव्यात.अंगणवाडी मदतनीस/सेविका पदभरतीमध्ये स्त्री परिचर याना प्रथम प्राधान्य मिळावे.कोरोना योद्ध्या म्हणून सन्मान व्हावा.विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता मिळावा.भाऊ बीज रकमेमध्ये वाढ करणेत यावी.या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
