आचरा येथे कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर संपन्न

*⚡मालवण ता.२५-:* अन्याय होत असेल तर प्रत्येकाला न्यायालयात न्याय  मिळू शकतो. आज आपल्याला लोकन्यायालयाच्या माध्यमातून कुठचाही प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने तडजोडीने सोडवता येऊ शकतो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक नागरिकांने कायद्याची भीती न बाळगता कायदा  जाणून घ्यावा असे प्रतिपादन मालवणचे दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, मालवणचे श्री.बी. बी. चौहान यांनी येथे बोलताना केले. गावातील जुनी जाणती माणसे एकत्र येत आणि कोणाही मध्ये उदभवलेला कुठल्याही स्वरूपाचा वाद समजुतीने मिटवला जात असे. न्यायालयातील प्रलंबित खटले मोठया प्रमाणात आहेत. सामोपचाराने व समझोत्याने तडजोड होऊन असलेले वाद मिटवावेत व एकमेकांना मधील एकोपा कायम टिकवून ठेवावा असे आवाहन मालवणचे दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, मालवणचे श्री.बी. बी. चौहान यांनी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती मालवणतर्फे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत आचरा ग्रामपंचायत कार्यालयात कायदे विषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून ऍड शिल्पा टिळक, ऍड रमजान शेख, ऍड अक्षय सामंत, ऍड अमृता मोंडकर, आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, विस्तार अधिकारी गोसावी, तसेच आचरा गावच्या प्रथम नागरिक प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, माजी सभापती निलिमा सावंत, रियाज काझी मंगेश टेमकर व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी ऍड टिळक, शेख व मोंडकर यांनी विविध कायद्यांची माहिती ग्रामस्थांना दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच टेमकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार ऍड सामंत यांनी मानले.

You cannot copy content of this page