अनाथ मुलांच्या मदतीसाठी शिक्षकांचा पुढाकार

दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.२६-:* कोविडमुळे वेंगुर्ला तालुक्यातील जे विद्यार्थी अनाथ झाले आहेत, त्यांना मदत करण्यासाठी वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक कलामंचने पुढाकार घेतला आहे. यासाठी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्वामिनी हॉल, पाटकर हायस्कूलजवळ, वेंगुर्ला येथे ‘भौमासूर वध‘ अर्थात ‘नरक चतुर्दशी महिमा‘ या महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकाची निर्मिती व दिग्दर्शन शिक्षक सिताराम नाईक यांनी केली असून यामध्ये धनंजय नाईक, तन्वी रेडकर, प्रियांका बालम, प्रकाश तांबे, तुळशीदास पाटकर, ज्ञानेश्वर हरमलकर, झिलू घाडी, रामा पोळजी, प्राजक्ता आपटे, सिताराम लांबर, समता वारंग, त्रिबक आजगांवकर आदी शिक्षक भूमिका साकारणार आहेत. यांना नितीन गावडे, सिद्धेश दाभोलकर, अजय शेलटे हे संगितसाथ करणार आहेत. हे नाटक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून ज्या दात्यांना कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करावयाची आहे त्यांनी व्यवस्थापकांशी किवा सिताराम नाईक (९४२१२३४०८४) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page