*⚡वेंगुर्ला ता.२६-:* आकाश कंदीलच्या निर्मिती बरोबरच विद्यार्थ्यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेतोरे हायस्कूलने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला असून आकाशकंदिलासोबत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सुमारे १००० ग्रिटींग कार्डचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वनिर्मितिचा आनंद घेण्यासाठी, त्यांची जिज्ञासेतून सर्जनशीलता आणि चिकित्सक विचार क्षमता विकसित करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे श्री देवी सातेरी हायस्कूलमार्फत सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या हजारो ग्रिटींगकार्डचे प्रदर्शन
