जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नवाढीसाठी शेती प्रक्रिया उद्योगांवर भर द्या…

खा. नारायण राणे: खा.राणे यांनी दिलल जिल्हा परिषदेला भेट..

⚡ओरोस ता ११-: जिल्ह्यात उद्योग नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शेती, बागायती हाच पर्याय आहे. यातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. तरच जिल्ह्याला जास्त उत्पादन मिळून दरडोई उत्पन्नात भर पडणार आहे. याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकारी यांना आवाहन केले आहे. कृषी विभागाने यावर भर द्यावा, अशा सूचना केल्या असून जिल्हा परिषदेतील रिक्त पदे, निधीची गरज याचा आपण अहवाल मागवला आहे. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवणार आहे, असे खा नारायण राणे यांनी सांगितले.
खा राणे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेला भेट दिली. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी प्रथम आणि नंतर पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन स्वतंत्र चर्चा केली. यावेळी अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपाध्यक्ष तुकाराम साईल, सभापती संतोष साटविलकार, प्रितेश राऊळ यांच्यासह दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे आदी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर खा राणे यांनी अध्यक्ष दालनात माध्यमांशी संवाद साधला. ही भेट आपण स्वतःहून घेतली आहे. जिल्हा परिषद मधील समस्या समजाव्यात आणि काही सूचना कराव्यात या उद्देशाने ही भेट घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पुढे बोलताना, जिल्ह्यातील पर मानसी उत्पन्न वाढले पाहिजे. यासाठी शेतीतील एकरी उत्पन्न वाढले पाहिजे. यासाठी प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत. यासाठी आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांना शेतीकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी आपले काम जबाबदारीने पूर्ण करावे. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना शासनाच्या योजना सांगून कामाला लावले पाहिजे. नवनवीन नियम समजावून सांगितले पाहिजेत. शेतकऱ्यांना बियाणे वाटप करताना एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना आपण केल्याचे खा राणे यांनी यावेळी सांगितले.

चौकट
शासन सप्टेंबर महिन्यात निधी मंजूर केल्याचे पत्र देते. आपण समाधानी होतो. प्रत्यक्षात ३१ मार्च रोजी पैसे मिळतात. त्यामुळे कामे होत नाहीत. आरोग्याला डॉक्टर नाहीत. याबाबत आपण मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधणार आहोत. जिल्ह्यात कृषी आणि उद्योग यांची वारंवार बैठक घ्यावी लागेल. तसा माझा प्रयत्न राहणार आहे, असे यावेळी खा राणे यांनी स्पष्ट केले.

चौकट
आंबा, काजू उत्पादन यावर्षी संकटांत आहे. हे मोठे वास्तव आहे. ते शासनाने मान्य केले आहे. म्हणून हेक्टरी २२ हजार रुपये नुकसानी मंजूर केली आहे. ही जाहीर केलेली मदत शेवटची नाही. गरज पडल्यास अजून मदत जाहीर होईल, असे यावेळी खा राणे यांनी राजू शेट्टी यांच्या वर्षा बंगल्यावरील आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page