‘मल्टिस्पेशालिस्ट’ रुग्णालयाची ज़िल्हावासियांना प्रतीक्षा
केव्हा थांबणार ससेहोलपट?;स्वप्नपूर्तीसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज *⚡सावंतवाडी ता.२७ संतोष ठाकूर-:* सिंधुदुर्ग ज़िल्ह्यातील आरोग्य सेवा विविध समस्यांमुळे पूर्णतः कोलमडली आहे. खासगी रुग्णालयांची अवाढव्य बिले भरण्याची क्षमता सर्वासामान्यांमध्ये नाही. गोवा रुग्णालयानेही अटी-शर्ती ठेवल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत नव्याने होऊ घातलेल्या मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयावर सर्वांच्या आशा स्थिरावल्या असून तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर…
