मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील शाहिदाना सावंतवाडीत श्रद्धांजली

युवराज खेमसावंत भोसले यांनी केले पुष्पचक्र अर्पण

*⚡सावंतवाडी ता.२६-:* मुंबई येथे 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना आज सावंतवाडी येथील केशवसुत कट्टा येथे युवराज खेम सावंत भोसले यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई येथे १३ वर्षांपूर्वी २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सैनिक यांना लोकांचे प्राण वाचवताना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. यावेळी अनेक लोकांचे हकनाक बळी गेले होते. १० दहशतवाद्यांनी मुंबईकर हल्ला करत मुंबईला वेठीस धरले होते. यावेळी आपल्या शुर पोलिस प्रशासनाने आणि सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देत विरता दाखवत ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडले होते. या हल्ल्यात बळी गेलेल्या सर्व शहिदांना आज निशांत तोरसकर मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडी येथील केशवसुत कट्ट्यावर श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शंकर कोरे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, संस्थानचे युवराज लखम राजे भोसले, नगराध्यक्ष संजू परब, सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडीतील नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page