Headlines

कणकवलीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अबिद नाईक यांच्या हस्ते स्वागत

कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कणकवली तहसील कार्यालय येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले.

या शिबिरासाठी महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी (देवगड), प्रांतिक सदस्य विलास गावकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page