कळसुली येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये योग्य सन्मान मिळेल:अमित सामंत

*⚡कणकवली ता.२६-:* ज्या कळसुली गावाने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यांचे नेतृत्व करायला संधी दिली.त्याच कळसुली गावातील अनेक कार्यकर्त्यांनी आज प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेत जाहीर प्रवेश करुन कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघ यापुढे राष्ट्रवादीमय करू अशी ग्वाही प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी प्रवेशादरम्यान दिली. यावेळी प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर,भास्कर परब ‌ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर,युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक,उपाध्यक्ष अनंत पिळणकर, सुनील भोगटे.ओबीसी सेल तालुका अध्यक्ष बाळा मेस्त्री.विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत,उत्तम सराफदार,उपस्थित होते, देशाचे नेते शरद पवार , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारधारेवर विश्वास ठेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहोत. यापुढे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली काम करणार, तसेच पुढील महिन्यात होऊ घातलेल्या कळसुली ग्रामपंचायत पोट निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाग घेऊन दोन्ही जागावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार निवडून आणून त्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनेची ताकद दाखवून देऊ असे सांगितले. यावेळी बाबाजी वासुदेव मुरकर, शंकर बाबू गावकर, वासुदेव सहदेव मांजरेकर, प्रकाश सहदेव नाईक, विजय आत्माराम दळवी, प्रमोद आत्माराम भोगले, अर्जुन सिताराम चव्हाण, नितीन रामचंद्र भोगले, महेंद्र रोहिदास शिर्के, भरत विजय गावकर, प्रकाश साळसकर, लक्ष्मण चंद्रकांत घाडीगांवकर, श्रीकृष्ण रामचंद्र घाडीगावकर, प्रमोद सहदेव गावकर, समीर शिवाजी घाडीगावकर, दत्तप्रसाद प्रमोद गावकर, अमर जगन्नाथ घाडीगावकर, मारुती सहदेव गावकर, प्रेमनाथ जगन्नाथ घाडीगावकर, अक्षय संतोष घाडीगावकर, सचिन चंद्रकांत घाडीगावकर, रुपेश मारुती गावकर, नामदेव धोंडी घाडीगावकर, शिवाजी तातोबा घाडीगावकर, विनोद जगन्नाथ घाडीगावकर, दीपेश प्रवीण घाडीगावकर, प्रथमेश सिताराम घाडीगावकर, तातोबा शिवाजी घाडीगावकर, रजनीकांत सावंत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचार धारेवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत जाहीर प्रवेश करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर जो विश्वास दाखवला तो कधीही वाया घालवू देणार नाही, तुमच्या भागातील काही प्रलंबित सार्वजनिक विकासाचे प्रश्न असतील ते प्रफुल्ल सुद्रीक यांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर पाठवा,त्यांचा पुढील पाठपुरावा आम्ही करुन आपले विकासात्मक प्रश्न मार्गी लावू. असे सांगितले.

You cannot copy content of this page