तालुक्यातील त्या हॉटेलवरील कारवाई योग्यच…

जिल्ह्याची संस्कृती बिघडू नये; परशुराम उपरकर

*⚡सावंतवाडी ता.२६-:* तालुक्यातील एका हॉटेल मध्ये करण्यात आलेली कारवाई ही योग्यच असून, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या कारवाईला केलेला विरोध चुकीचा असल्याचे मत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. जिल्ह्यात पाश्चिमात्य संस्कृती येऊ नये यासाठी पोलिसांकडून केलेली कारवाई योग्यच आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या सर्व पुरुष, महिला, तसेच त्या हॉटेल मालक आणि स्टाफ ची सखोल चौकशी होणे गरजेची असून, आपण तशी पोलिस अधीक्षक यांच्याकडे मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात पर्यटन व्हावे परंतु, जिल्ह्याची संस्कृती बिघडू नये असे देखील ते म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page