सिंधुनगरी प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा राणेवाडी येतील सुंदरी विष्णू पालव हिच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र खेचून हॅल्मेट धारक मोटारसायकलस्वारानी पोबारा केला. रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरीकांनी भीती व्यक्त केली आहे. शुक्रवारी दु. पावणे दोनच्या दरम्याने ही चोरी झाली. हुमरमळा राणेवाडी येथील रहिवाशी असलेल्या सुंदरी विष्णू पालव या आपल्या डाॅन बास्को शाळेतुन घरी येणार्या नातीला घेण्यासाठी महामार्गावरील हुमरमळा राणे दुकान स्टाप जवळ आल्या होत्या व बारा वर्षीय नातीला घेऊन परतत असताना मोटारसायकल मागे बसलेल्या चोरट्याने त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचून पोबारा केला. मंगंळसुत्र खेचताना त्या महिलेला ढकलल्याने तीचा तोल गेला व ती खाली जमीनीवर कोसळली. तर तीच्या सोबत असलेल्या नातीने त्या दोघाना पळून जाताना पाहीले असून मोटार सायकल स्वाराच्या डोक्यात हँल्मेट होते तर मागे बसलेल्या चोरट्याच्या डोक्यात हॅल्मेट नव्हते. ओरोस पोलीसांना ही घटना समजताच पोलीसांनी तातडीने शोध सुरु केला आहे. शंभर मिटरवर असलेल्या पोलीसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे व त्यांची मोटारसायकल चित्रित झाले असून पोलिसांनी महामार्गावरील अन्य ठिकाणच्या कॅमेर्यां वरील चित्रफीत शोधकार्यासाठी हाती घेतली आहे. या चोरी नंतर मोटारसायकल स्वार व पाठीमागे बसलेला चोरटा कुडाळच्या दिशेने पळून गेला आहे.
महामार्गावरील हुमरमळा येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून मोटारसायकलवरील चोरट्यांचा पोबारा
