पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेत केली लूट

डोंगर पोखरून काढली घुस काढली माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची टीका

मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपालिकेकडून शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर गेल्या पाच वर्षात ३ कोटी १० लाख ७४ हजार ४८८ रुपये एवढा विक्रमी खर्च झाला असताना घनकचरा निर्मूलन यादीत मालवण नगरपालिकेचा पश्चिम विभागात १३४ वा तर राज्यात ७२ वा क्रमांक आला. यामुळे मालवण नगरपालिकेची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. डोंगर पोखरून उंदीर नव्हे तर घुशी मिळाल्याचा हा प्रकार असून यास नगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा कारभार जबाबदार असून सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशाची केवळ लूट केली आहे, अशी टीका मालवणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. मालवण भाजप कार्यालय येथे सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आचरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी मालवण नगरपरिषदेच्या कामकाजाचा आढावा घ्यावा. मागील पाच वर्षात आमदारांच्या हस्ते भूमिपूजन झालेले शहरातील एकही काम अद्याप पूर्ण का होऊ शकले नाही, याची विचारणा आमदारांनी नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांना केली आहे का ? शहरातील कचरा डंपिंग ग्राउंडवर जाऊन एकदा त्यांनी येथील परिस्थिती पाहावी, नगरपरिषदेतील शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी शहराची बकाल परिस्थिती केली आहे. घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला, तरीही घनकचरा अभियानात मालवण नगरपरिषद कमालीची पिछाडीवर गेली आहे. २०११ ते २०१५ या कालावधीत तीन वेळा राज्य स्तरावर तर दोन वेळा विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या मालवण नगरपरिषदेचा नावलौकिक शिवसेनेने धुळीस मिळवला आहे. २०१६ मध्ये ही नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात गेल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनावर तब्बल ३ कोटी १० लाख ७४ हजार ४८८ रुपयांचा खर्च करण्यात आला. तरीही घनकचरा अभियान स्पर्धेत मालवण नगरपरिषद पिछाडीवर गेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या चार राज्यांच्या विभागात मालवण नगरपरिषद तब्बल १३४ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. या अभियानात वेंगुर्ला नगरपरिषद १७ व्या, सावंतवाडी नगरपरिषद ३२ व्या, कणकवली नगरपंचायत ६७ व्या स्थानावर राहिली. राज्यस्तर अभियानातही मालवण नगरपरिषदेने ७२ वा क्रमांक मिळवला आहे. या अभियानात वेंगुर्ला १६ व्या, सावंतवाडी २८ व्या तर कणकवली नगरपंचायत ४८ व्या स्थानावर आहे. शिवसेनेने संपूर्ण शहर बकाल बनवले असून याचा प्रत्यय या अभियानातून आल्याची टीका सुदेश आचरेकर यांनी केली. आमच्या ताब्यात नगरपालिका असताना २०११ ते २०१५ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापनावर १ कोटी १३ लाख ४४ हजार रुपये खर्च करण्यात आला. या कालावधीत आम्ही तीन वेळा राज्य स्तरावर तर दोन वेळा विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले. मग आताच्या सत्ताधाऱ्यांनी घनकचरा, स्वच्छता, ट्रॅक्टर जेसीबी यांसारख्या कामावर तीन कोटी रुपये खर्च कचरा व्यवस्थापनावर खर्च करूनही शहर एवढे पिछाडीवर का ? जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या भाड्यासाठी २०११ ते २०१५ या कालावधीत एक रुपयांचाही खर्च करण्यात आला नाही. पण विद्यमान सत्ताधाऱ्यांनी १४ लाख ७६ हजार रुपये एवढा खर्च जेसीबी आणि ट्रॅक्टर साठी केला आहे. कोणाचा संसार उभा करण्यासाठी एवढा खर्च करण्यात आला ? असा सवाल सुदेश आचरेकर यांनी केला. मालवण नगरपालिकेकडे अलीकडच्या काळात विकास कामांचा जो निधी आला, तो प्रशासकीय स्वरूपाचा निधी आहे. यामध्ये दलित वस्ती योजना वैशिष्ट्यपूर्ण कामे, रस्ते अनुदान यांसारख्या हेडचा समावेश आहे. हा निधी मिळविण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. शहराच्या लोकसंख्येनुसार सदरचा निधी नगरपालिकेला देण्यात येतो. त्यामुळे मालवण नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या विशेष प्रयत्नातून असा कोणता निधी आणला ते जाहीर करावे, क्षुल्लक कामांच्या भूमिपूजनासाठी आमदारांना येथे यावे लागते, हे दुर्दैव आहे. ही भूमिपूजने स्थानिक ज्येष्ठ नागरिक अथवा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करणे उचित ठरले असते, असा टोलाही सुदेश आचरेकर यांनी लगावला. मालवण बसस्थानकाचे पालकमंत्री, आमदार, खासदारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कामाचे पुढे काय झाले? साई मंदिर नजीकच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम कशासाठी रखडले? असा सवाल सुदेश आचरेकर आणि गणेश कुशे यांनी केला. मत्स्यालयासाठी दहा कोटींचा निधी आणल्याचे आमदार सांगत आहेत. मग या कामाचे भूमिपूजन का करण्यात आले नाही ? स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी एक रुपयांचा निधी अद्याप पर्यंत आला नसताना त्याचे भूमिपूजन करून येथे काम कसे सुरू करण्यात आले असा प्रश्न गणेश कुशे यांनी उपस्थित केला. विविध कामांचे संबंधित ठेकेदार नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना जुमानत नाहीत, पाच वर्षात कोणती विकासकामे पूर्ण केली ? याचे उत्तर देण्याचे आव्हान सुदेश आचरेकर आणि गणेश कुशे यांनी दिले. एक वर्षापूर्वी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष शहर

You cannot copy content of this page