कसई दोडामार्ग नगरपंचायतीवर भाजपाचाच नगराध्यक्ष बसवणार – राजन तेली

*⚡दोडामार्ग ता.२६ सुमित दळवी-:* कसई – दोडामार्ग नगरपंचयतची निवडणूक जाहीर झाली असून २१ डिसेंबर ला मतदान होणार आहे, याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोडामार्ग येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गटागटाचे राजकारण संपवा.दोडामार्ग नगरपंचायत मध्ये आगामी निवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहिला पाहिजे असे सांगण्यात आले होते. कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.भाजपा पक्ष पूर्ण ताकदीने काम करणार असून कसई दोडामार्ग नगरपंचयातीवर भाजपचाच झेंडा फडकेल असे म्हटले आहे तर आघाडी सरकारने आतापर्यंत फक्त फसवेगिरी केली आहे,निवडणूकीच्या तोंडावर उद्योग आणतात आणि फक्त भूमिपूजन करून ठेवतात,असे बरेच उद्योग आघाडी सरकार करत आहे आणि लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकत आहे,असा टोला तेली यांनी लगावला. त्यामुळे जनताच त्यांना योग्य ते उत्तर देईल असेही सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण,भाजपाचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवून कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये भाजपाचाच नगराध्यक्ष बहुमताने बसवू असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला.यावेळी तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, एकनाथ नाडकर्णी, चेतन चव्हाण,संतोष नानचे राजू निंबाळकर, रंगनाथ गवस, शैलेश दळवी, बाळा नाईक,पांडुरंग बोर्डेकर,रमेश दळवी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page