शहीद विजय साळसकर यांना सेनेने वाहिली श्रद्धांजली

२६/११ च्या हल्ल्यात आले होते वीर मरण;एडगांव येथील स्मारकाला केले अभिवादन

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी येथे आज दि.२६ नोव्हेंबर रोजी २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्यात शहीद झालेले वैभववाडी तालुक्यातील एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याला कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी पुष्पहार अर्पण केला. अमर रहे..! अमर रहे..! विजय साळसकर अमर रहे..! अशा‌ घोषणा देत उपस्थित शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, संभाजी रावराणे, शहर प्रमुख प्रदिप रावराणे,उपशहर प्रमुख सुनील रावराणे, युवासेना सचिव स्वप्निल धुरी, व्यापारी मंडळाचे माजी अध्यक्ष मनोज सावंत, यशवंत सुर्वे, रणजित तावडे,सिद्धू गावडे, संजय निकम, रवींद्र चव्हाण, सुंदराबाई निकम, अनिता करकोटे यांच्या बरोबर अन्य पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page