त्या ग्रामसेवकावर तीन महिने उलटूनही कारवाई नाही

पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ आक्रमक

सावंतवाडी वेत्ये येथील ग्रामसेवकाने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीला तीन महिने होऊन देखील संबंधितांवर कोणतीच कारवाई न झाल्याने पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ शुक्रवारी मासिक सभेत चांगलेच आक्रमक झाले. या मागणीला तीन महिने झाले तरी कारवाई सोडाच मात्र बैठकीला साधा अहवाल देखील सादर केला गेला नाही यामुळे वरिष्ठ अधिकारीच आपल्या अधिकारी वर्गाला पाठीशी घालत आहेत असा आरोप राऊळ यांनी केला. त्यावर गटविकास अधिकरी रवींद्र कणसे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून येत्या आठ दिवसात लेखी अहवाल उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page