वैभववाडी नगरपंचायत मध्ये येणाऱ्या निवडणुकीत भगवा फडकवणार…

अतुल रावराणे यांचा विश्वास

वैभववाडी प्रतिनिधी गेल्या पाच वर्षात वैभववाडी शहर बकाल झाले होते. या शहराला शिवसेनेच्या माध्यमातून गतवैभव मिळवून देणार. येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवणार असा विश्वास शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी व्यक्त केला. शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे,तालुका प्रमुख मंगेश लोके,बँक संचालक दिगंबर पाटील,शहर प्रमुख प्रदीप रावराणे,स्वप्नील धुरी,दिपक गजोबार, मनोज सावंत,सुंदरा निकम,रणजित तावडे,संजय निकम आदी उपस्थित होते. रावराणे म्हणाले,शिवसेनेने आज उमेदवारांची चाचपणी केली.प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार अनेक आहेत.इच्छुकांचे अर्ज पक्ष कार्यालयात सोमवारी आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल.तो निर्णय प्रत्येकाला बंधनकारक राहणार आहे.महाविकास आघाडीचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार आहेत अस रावराणे यांनी सांगितले.नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याचा विश्वास रावराणे यांनी व्यक्त केला. मागील पाच वर्षात शहरात विकास कामे होऊ शकली नाहीत.संपुर्ण शहर बकाल केले. शहरातील पाणी प्रश्न, स्ट्रीट लाईट आदी प्रश्न मार्गी लागले नाहीत. स्मारकांची दुर्दशा झाली आहे. आता या शहराला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याच काम शिवसेनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. नगरपंचायतीत जनतेच राज्य आणणार असल्याचे रावराणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page