सुदैवाने जीवितहानी नाही; मात्र गाडीचे नुकसान
*⚡सावंतवाडी ता.२७-:* गव्यारेड्याने गाडीला ठोकर दिल्याने शासकीय ठेकेदार के.सी. शिवन्ना यांचे सुपुत्र दिपक शिवन्ना यांचा आंबोली येथे अपघात झाला असून, या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, सुदैवाने या अपघातात कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. हा अपघात आज पहाटे झाला असून, या अपघाता बाबत भाजप सावंतवाडी पदाधिकारी बंटी पुरोहित यांनी माहिती दिली आहे.
