राज्यस्तरीय कला उत्सवासाठी खारेपाटण ज्युनिअर कॉलेजच्या हरिदास घेवडेची निवड

*⚡कणकवली ता.२९-:* शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकताच ऑनलाईन माध्यमातून जिल्हास्तरीय (सिंधुदुर्ग जिल्हा) कला उत्सव संपन्न झाला. या कलाउत्सवात खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथील इयत्ता अकरावी कला शाखेचा विद्यार्थी कु.हरिदास गणेश घेवडे याने शास्त्रीय संगीत…

Read More

संविधानिक मुल्य जपली तरच लोकशाही अबाधित राहील :डॉ. अनंत राऊत

कणकवली महाविद्यालयात भारतीय संविधान दिनानिमित्त व्याख्यान *⚡कणकवली ता.२९-:* देशात सामाजिक शैक्षणिक व आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधान महत्त्वपूर्ण ठरले आहे. संविधानामुळे समस्त नागरिकांना शिक्षण मिळाले व सर्वांगीण विकासाची संधी मिळाली. सर्व नागरिकांनी संविधाना कडून मिळालेले अधिकार याबरोबरच नागरिकांची कर्तव्य याचीही अंमलबजावणी करायला हवी,संवैधानिक मुल्य जपली तरच भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही अबाधित राहील असे…

Read More

वारस नोंदणीसाठी विधवा तसेच पालक गमावलेल्या मुलांची गावनिहाय यादी द्यावी

निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड *⚡सिंधुदुर्गनगरी, दि.२९-:* कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांबाबत तसेच विधवांचे वारस नोंदणीसाठी गाव निहाय, तालुका निहाय यादी द्यावी. तहसिलदारांच्या माध्यमातून वारस नोंद केली जाईल, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केली. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव…

Read More

अभ्यासपूर्वक गुंतवणूक करा: भावेश व्होरा

*⚡कणकवली ता.२९-:* गुंतवणूक करताना डोळसपणे गुंतवणूक करणे आवश्यक आह. खोट्या योजनांना न फसता सुरक्षित गुंतवणूक करा. पैशाला आपला मित्र बनवा, म्हणजे तो आपल्या सोबत राहील. असे मत भावेश व्होरा यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अर्थशास्त्र विभाग, आय क्यू ए सी व गुंतवणूकदार शिक्षण व कल्याण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

Read More

विविध स्पर्धांमध्ये अणसूरपालच्या विद्यार्थ्यांचे यश

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव अंतर्गत तुळस प्रभागात अणसूरपाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यात निबंध स्पर्धेत यशश्री केरकर (द्वितीय), वक्तृत्व स्पर्धेत काजल गावडे (तृतीय), चित्रकला स्पर्धेत सानिया पालकर (प्रथम), रांगोळी स्पर्धेत काजल गावडे (प्रथम) व चरित्रा राऊळ (द्वितीय) यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अणसूर-पाल विकास मंडळ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष…

Read More

अवकाळी पावसापासून आंबा, काजूच्या रक्षणासाठी उपाययोजना

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* भारतीय हवामान खात्याने कोकण विभागात पुढील काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आंब्यावर तुडतुडे, फुलकिडी, भुरी व करपा तसेच काजूमध्ये ढेकण्या फुलकिडी व करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी आंबा व काजू बागायतदारांनी वेळोवेळी पिकांचे सर्वेक्षण करुन काळजी घ्यावी असे आवाहन वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे केले आहे. मोहरलेल्या बागांमध्ये मोहोर…

Read More

जेलिफिश व केंड माशामुळे होणाऱ्या नुकसानीची मत्स्य मंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी – अन्वय प्रभू

*⚡मालवण ता.२९-:* जेलिफिश आणि केंड माशामुळे मच्छीमारांना होत असलेला त्रास आणि त्यामुळे जाळ्यांचे होणारे नुकसान याची पाहणी मत्स्यविकास मंत्री अस्लम शेख यांनी थेट समुद्रकिनारी येऊन करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमार अन्वय प्रभू यांनी केली आहे. महापूर तसेच अवकाळी पावसानंतर केंद्र व राज्यातील विविध मंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतात. त्याचप्रमाणे जेलिफिशमुळे पारंपरिक रापण…

Read More

अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

३० डिसेंबरला निवडणूक ३१ डिसेंबरला मतमोजणी *⚡ओरोस ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच पक्ष्यांसाठी महत्व मानली जाणारी जिल्हा बँकेची निवडणूकचा कार्यक्रम अखेर जाहीर झाली आहे.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता 30 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे तर जिल्हा बँकेत निवडणुकीतीची मतमोजणी ३१डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानुसार आज पासून म्हणजेच २९नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र उपविभागीय अधिकारी महसूल…

Read More

एसटी संपाचा विद्यार्थी, व्यावसायिकांना नाहक त्रास

मंगेश तळवणेकर यांनी परिवहन मंत्र्यांचे वेधले लक्ष;चार दिवसात संप न मिटल्यास आंदोलनाचा दिला इशारा *⚡सावंतवाडी ता.२९-:* एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने शाळकरी मुले, व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते, प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा गांभीर्याने विचार करुन येत्या चार दिवसात एस.टी. कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करुन त्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करुन घेण्यात यावे. अन्यथा…

Read More

ऐतिहासिक भरतगडावर “जागतिक वारसा सप्ताह साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आणि रत्नागिरी राज्य पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन *⚡सावंतवाडी ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भरतगडावर सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आणि सहाय्यक संचालक रत्नागिरी (राज्य पुरातत्व विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक वारसा सप्ताह’ साजरा करण्यात आला. ऐतिहासिक स्थळ भ्रमंती व गड स्वच्छता मोहीम राबवून हा जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात…

Read More
You cannot copy content of this page