मंगेश तळवणेकर यांनी परिवहन मंत्र्यांचे वेधले लक्ष;चार दिवसात संप न मिटल्यास आंदोलनाचा दिला इशारा
*⚡सावंतवाडी ता.२९-:* एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने शाळकरी मुले, व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते, प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा गांभीर्याने विचार करुन येत्या चार दिवसात एस.टी. कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करुन त्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करुन घेण्यात यावे. अन्यथा प्रवासी व शाळकरी मुले यांना घेऊन मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा. श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्षव माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात तळवणेकर यांनी अनेक मुद्दे समोर आणले आहेत. त्यामध्ये 1) वाहकाची तिकीट मशीन ट्रायमॅक्स कंपनी तिकीटामागे 50 पैसे 2) एस.टी.स्टॅँड स्वच्छता ब्रिक्स कंपनी 3) प्रत्येक एस.टी.स्टॅँड वरील संडास व मुतारी यासाठी सुलभ शौचालय कंपनी 4) शिवशाही बस स्वच्छता, चालक, देखभाल व दुरुस्ती 5) सर्व बस स्थानकावरील पार्सल व कुरीयर सुविधा 6) महामंंडळाची बसस्थानक व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षा व्यवस्था सुरम, सुरक्षा व मेस्को कंपनी 7) कामगारांच्या गणवेशासाठी आदी 7 कोटी खर्च होता. त्यानंतर कंपनीला दिल्यानंतर 73 कोटी 8) मार्गावरील बसचे अचूक स्थान करण्यासाठीची जी.पी.एस. सुविधा 9) बस स्थानकावरील अनाऊन्समेंट, जाहीरात, फ्लेक्स बोर्ड जाहीरात तसेच बस वरील जाहीरात. 10) संगणकीय आरक्षणासाठी लागणारे सर्व हार्डवेअर संगणकाचे सर्व पार्ट 11) प्रशासकीय कामासाठी वापरण्यात येणारे सर्व संगणक व इंटरनेट सेवा 12) बसमध्ये बुट कंपनीचे वायफाय बॉक्स बसविण्यात आले त्याचा खर्च 200 कोटी रुपये. (कंपनीने इतके प्रामाणिक काम केले की, बसस्थानकामधील नादुुरुस्त बसमध्ये सुद्धा वायफाय बॉक्स बसविण्यात आले.) 13) मराठी भाषा दिवस साजरा करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. 14) बस सॅनिटायझरचे कंत्राट (यामध्ये बंद व स्क्रॅप बस वरही निर्जंतुकीकरण करणेत आले.) 15) जुन्या चेसवर स्टील बॉडीत रुपांतर 16) गाडीवर बसविलेले एस.एल.डी. युनिट 17) बसमध्ये मार्ग सुचित करण्यासाठी एल.ई.डी. बोर्ड 18) प्रत्येक प्रवासी तिकीटामागे 1 रुपया अपघात निधी घेतला जातो तो कुठे जातो? 19) बेलची दोरी रु.40 लावली जाते. ब्लॅकमध्ये त्याची किंमत रु.2/- आहे. 20) विविध सवलत योजना महामंडळ देते त्याचे काय? 21) राज्यात 17 टक्के प्रवासी करत, इतर राज्यात 7 टक्के 22) शिवशाही, शिवनेरी या बसेस कोणाच्या आहेत व त्यावर महामंडळ किती तोट्यात आहे ? 23) कॉईनबॉक्सचा घोटाळा काय आहे? 24) बी.ओ.टी. चे काय झाले ? 25) व्ही.टी.एस. टेंडरचे काय झाले? 26) अधिकृत धाबे यामध्ये किती घोटाळे आहेत? 27) भांडार व खरेदी यामध्ये टेंडर मध्ये किती घोटाळे आहेत? 28) डिझेलचा अपकारी कर काढा. 29) सार्वजनिक जागेचे व वापराचे जागेचे फंड काय केले? 30) जीप खरेदी किती घोटाळे आहेत? 31) बस स्क्रॅपचा घोटाळा किती आहे? 32) स्क्रॅपमधील चेसीचे काम झाले? 33) अंगणवाडी, आशासेविका व पोलीस यंत्रणा यांचा संबंध नसताना संबंध दर्शविणे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून येत्या चार दिवसात एस.टी. कर्मचाऱ्याच्या मागण्या पुर्ण न झाल्यास प्रवासी व शाळकरी मुले यांना घेऊन मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.