⚡सावंतवाडी ता.०९-:येथील तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धोबीपछाड देत अपक्षांनी बाजी मारली.तालुक्यातील एकूण जिल्हा परिषदेमध्ये ५ ठिकाणी भाजप, ३ ठिकाणी अपक्ष तर १ जागेवर शिंदे शिवसेनेने बाजी मारली. तर पंचायत समितीमध्ये ५ ठिकाणी अपक्ष, ६ ठिकाणी शिंदे शिवसेना, ६ ठिकाणी भाजप तर १ जागेवर उबाठाने बाजी मारली तालुक्यात लाज राखली. आंबोली, माडखोल, कोलगाव व आरोंदा येथे प्रस्तापितांना मतदारांनी स्पष्ठ नाकारले.
जिल्हा परिषदच्या ९ मतदारसंघापैकी सुरुवातीला माडखोलची मतमोजणी करण्यात आली. यात ४ हजार ३२७ मत घेत अपक्ष शिवानी नाईक विजयी झाल्या. भाजपच्या सुप्रिया मडगावकर यांनी ३ हजार ४८० मत पडली. ८४७ मतांनी अपक्ष नाईक यांनी भाजपचा इथे पराभव केला. आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. इथे भाजपने आपला झेंडा रोवला. भाजपच्या शोभा गावडे यांना ४ हजार ३९६ तर शिवसेनेच्या सुप्रिया गावडेंना ४ हजार ९७ मत पडली. सेनेच्या गावडेंचा २९६ मतांनी पराभव करत भाजपने विजय खेचून आणला. लक्षवेधी ठरलेल्या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे बंडखोर अपक्ष मायकल डिसोजांनी यश प्राप्त केले. भाजपच्या महेश सारंग यांचा त्यांनी ३३६ मतांनी पराभव केला. श्री. डिसोजा यांनी ४ हजार २१४ तर श्री. सारंग यांना ३८७८ मत मिळाली. विजयानंतर मायकल डिसोजा यांनी या विजयाचं श्रेय वडील ख्रि. फ्रान्सिस डिसोजा व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांन देत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तर चर्चेत राहिलेल्या तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या संदिप गावडे यांनी उबाठा शिवसेनेच्या रूपेश राऊळ यांचा तब्बल २ हजार ५२६ मतांनी पराभव केला. श्री. गावडेंनी चक्रव्यूह भेदून मोठ्या मताधिक्याने विजय खेचून आणला.
तसेच माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या विक्रांत सावंत यांनी तब्बल ३ हजार ४७३ एवढं मताधिक्य घेत विजयश्री प्राप्त केला. तालुक्यातील सर्वाधिक लीड मिळवण्याचा मान त्यांना गेला. त्यांना तब्बल ५ हजार १४१ तर उबाठा शिवसेनेच्या दिनेश सावंत यांना १ हजार ६६५ मत पडली. इन्सुलीत शिवसेनेच्या झेवियर फर्नांडिस यांना पराभवाचा धक्का बसला. अपक्ष नितीन राऊळ यांनी त्यांचा १ हजार १०४ मतांनी पराभव केला. श्री. राऊळ यांना ३ हजार ८६४ तर झेवियर फर्नांडिस यांना २ हजार ७६० तर अपक्ष सह स्वागत नाटेकर यांना ५२९ मत पडली. मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या अपर्णा सातोसकर ४ हजार ५६९ मत घेत विजयी झाल्या. त्यांना १ हजार ३२३ एवढं मताधिक्य मिळाले. शिवसेनेच्या प्रियांका नारोजी यांना ३ हजार २४६ मत प्राप्त झाली. आरोंदा मतदारसंघातून शिवसेनेच्या सुदन कवठणकर यांनी विजयी होत सेनेचा भगवा झेंडा फडकवला. तिनं ठिकाणी शिवसेनेला पराभवाला सामोर जाव लागलं असताना श्री. कवठणकर यांनी अंतिम क्षणी खिंड लढवली. त्यांना ३ हजार ३८६ तर अपक्ष शर्वाणी गांवकर यांना २ हजार ३४५ मत पडली. १ हजार ४१ मतांच लीड घेऊन कवठणकर विजयी झाले. बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे प्रमोद कामत बिनविरोध निवडून आलेत.
दरम्यान, पंचायत समिती माखडोल मतदारसंघात अपक्ष अवनी राऊळ यांनी भाजपच्या अनिता राऊळ यांचा ७०४ मतांनी पराभव केला. कलंबिस्तमधून अपक्ष प्रथमेश सावंत यांनी शिवसेनेच्या रमाकांत राऊळ यांना १ हजार १९६ मतांनी पराभूत केले. आंबोलीत शिवसेनेच्या मायकल डिसोजा यांनी भाजपच्या शशिकांत गावडे यांचा ४१७ मतांनी पराभव केला. विलवडेत भाजपचे प्रभाकर सुकी विजयी झाले. शिवसेनेच्या दिनानाथ कशाळकर यांचा त्यांनी ५५० मतांनी पराभव केला. कोलगावात शिवसेनेच्या प्रणाली टिळवे यांनी १११ मतांनी भाजपच्या संध्या हळदणकर यांना पराभूत केल. कारिवडेतून तिन अपक्षांच्या विरोधात २७७ च्या मताधिक्याने भाजपच्या प्राजक्ता केळुसकर विजयी झाल्या. तळवडेतून उबाठा शिवसेनेच्या श्वेता जाधव यांचा ६२८ मतांनी पराभव करत शिवसेनेच्या सुस्मिता जाधव विजयी ठरल्या. सभापती पदासाठी आरक्षित मतदारसंघ असल्याने त्यांची सभापती वर्णी लागणार आहे. मळगावमध्ये भाजपचे गौरव मुळीक ८३२ मतांनी विजयी झाले. माजगावात भाजप अन् शिवसेना उबाठाच्या उमेदवारांचा पराभव करत अपक्ष जितेंद्र गांवकर यांनी ९७१ मतांनी विजय खेचून आणला.
तसेच चराठेतून शिवसेनेच्या उत्कर्षा गांवकर ८३२ मतांनी विजयी झाल्या. इन्सुलीत भाजप अन् शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव करत अपक्ष सदाशिव राणे ८८३ मतांनी विजय प्राप्त केला. मळेवाड मधून भाजपच्या धनश्री मराठे यांनी तब्बल १ हजार ७६० मतांच मताधिक्य मिळवत घवघवीत यश संपादन केले. शिवसेना व उबाठा शिवसेनेचा त्यांनी पराभव केला. पंचायत समितीत सर्वाधिक लीड न निवडून येणाऱ्या त्या उमेदवार ठरल्या. न्हावेलीत शिवसेनेच्या शरद धाऊसकर विजयी झाले. भाजपच्या अष्टविनायक धाऊसकर यांचा त्यांनी २७४ मतांनी पराभव केला. आरोंदा येथे भाजपच्या नेहा कांबळी विजयी झाल्या.उबाठा शिवसेनेच्या सुवर्णा तिरोडकर यांचा त्यांनी ८४ मतांनी पराभव केला. सातार्डेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उदय पारिपत्ये ४३४ मतांनी विजयी झाले. बांदा येथे अपक्ष ऋतिका नाईक यांनी भाजपच्या रूपाली शिरसाट यांचा ३८२ मतांनी पराभव केला. भाजपचा ३५ वर्षांचा गड अपक्ष म्हणून त्यांनी नेस्तनाबूत केला. तांबोळीतून शिवसेनेच्या प्रियांका देसाई यांनी ७९८ मतांनी विजय खेचून आणला. या निवडणुकीत बंडखोर अपक्षांनी अधिकृत उमेदवारांना जेरीस आणलं. तर सर्वाधिक मताधिक्य घेऊन जिल्हा परिषदेत भाजपचे विक्रांत सावंत व सर्वात कमी मताधिक्याने भाजपच्या शोभा गावडे विजयी झाल्या. तर, पंचायत समितीत मळेवाड मधून भाजपच्या धनश्री मराठे यांना सर्वाधिक तर कोलगावमध्ये शिवसेनेच्या प्रणाली टिळवे यांनी सर्वांत कमी मताधिक्याने विजय खेचून आणला.
