⚡सावंतवाडी ता.०९- : आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुदा कवठणकर तसेच पंचायत समितीचे उमेदवार यांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर संजू परब यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.
संजू परब यांच्या कार्यालयाकडे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. “शिंदे शिवसेनेचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी विजयी उमेदवारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संजू परब यांचे आभार मानले. निवडणुकीदरम्यान सहकार्य व प्रोत्साहन दिल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.
