मळगाव येथे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष…

⚡सावंतवाडी ता.०९-: तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संदिप गावडे तसेच नेमळे–मळगाव पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गौरव मुळीक यांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर मळगाव येथे भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. विजयाची अधिकृत घोषणा होताच संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले.
मळगाव बाजारपेठेत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. दोन्ही विजयी उमेदवारांनी मळगाव येथील मायापूर्वचारी देवाचे दर्शन घेतले.
प्रचारादरम्यान संदीप गावडे व गौरव मुळीक यांनी गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला होता. त्यांच्या कार्यपद्धतीला व विकासाच्या दृष्टीकोनाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. या विजयामुळे मळगाव व परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. विजयी दोन्ही उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे तसेच मतदारांचे आभार मानत सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page