जिल्हा परिषद सात व पंचायत समितीच्या १४ जागांमध्ये भाजप–शिवसेना महायुतीचे वर्चस्व..
⚡देवगड ता.०९-: देवगड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप–शिवसेना महायुतीने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवत तालुक्यावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत विजय संपादन केला.
या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा फटका बसला असून एकमेव जागा वगळता सर्वत्र पराभव स्वीकारावा लागला. एकूण निकाल महायुतीच्या बाजूनेच लागला असून ग्रामीण भागात भाजपला मिळालेला भरघोस पाठिंबा हा महायुतीच्या ताकद ठरला आहे.
देवगड तालुक्यात 11 जागांसाठी निवडणूक झाली होती यामध्ये जिल्हा परिषदेच्या 3 तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी निवडणूक होती. यामध्ये पंचायत समितीमध्ये भाजपने 5 जागा शिवसेना 2 व ठाकरे शिवसेना 1 अशा आठ जागा निवडून आले आहेत. देवगड तालुक्यात पंचायत समितीच्या 14 जागांपैकी सहा जागा यापूर्वी भाजपने बिनविरोध काढले आहेत तर जिल्हा परिषदेच्या सात पैकी चार जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे एकूण चित्र पाहिलं तर देवगड तालुक्यातील सर्व जि. प गट भाजपकडे आहे.तर पंचायत समिती मध्ये भाजपच्या एकूण 11 व शिवसेनेच्या दोन अशा मिळून महायुतीचे संख्याबळ एकूण 13 झाले आहे. त्यामुळे देवगड पंचायत समितीचे सत्ता केंद्र हे महायुतीच्या ताब्यात आहे.
भाजपने जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व कायम राखले. शिवसेनेलाही महायुतीच्या माध्यमातून यश मिळाले असून दोन्ही पक्षांतील समन्वयामुळे देवगड तालुक्यातील सत्तास्थान अधिक भक्कम झाले आहे. उबाठा गटाचा प्रभाव बहुतांश ठिकाणी दिसून आला नाही.
एकूणच, देवगड तालुक्यातील हा निकाल भाजप–शिवसेना महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला असून स्थानिक राजकारणात महायुतीची पकड अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
देवगड तालुका : जिल्हा परिषद व पंचायत समिती – सविस्तर निकाल
जिल्हा परिषद मतदार संघ : १२ पुरळ (सर्वसाधारण)एकूण मते -7258 नोटा – 82
विजयी उमेदवार : संजय नामदेव बोंबडी (भाजप) – 4468 मताधिक्य 1760
सुनिल दत्ताराम तेली (शिवसेना उबाठा) – 2708
पंचायत समिती मतदार संघ : २३ पुरळ (ना.मा.प्र महिला)
एकूण मते – 3698 | नोटा – 71
विजयी उमेदवार : संजना सत्यवान आळवे (भाजप) – 2395 , मताधिक्य 1163
सानवी सुधाकर तिर्लोटकर (शिवसेना उबाठा) – 1232
पंचायत समिती मतदार संघ : २४ तिर्लोट (सर्वसाधारण)
एकूण मते – 3560 | नोटा – 64
विजयी उमेदवार : रविंद्र राजाराम तिर्लोटकर (भाजप) – 1958 मताधिक्य 420
सुनिल गणपत तिलोंटकर (शिवसेना उबाठा) – 1538
पंचायत समिती मतदार संघ : २८ मणचे (सर्वसाधारण)एकूण मते – 3419 | नोटा – 53
विजयी उमेदवार : विष्णू बाबाजी घाडी (शिवसेना उबाठा) – 1734 मताधिक्य 102
विलास मधुकर साळसकर (शिवसेना) – 1632
|
पंचायत समिती मतदार संघ : २९ पोंभुर्ले (ना.मा.प्र)एकूण मते – 2775 | नोटा – 50
विजयी उमेदवार : सादीक जैनुद्दीन डोंगरकर (भाजप) – 1912
व्यंकटेश जगन्नाथ नर (शिवसेना उबाठा) – 813
|
जिल्हा परिषद मतदार संघ : १६ शिरगांव (अनुसूचित जाती)एकूण मते – 5905 |
नोटा – 114
विजयी उमेदवार : देवदत्त दामोदर कदम (भाजप) – 3988 मताधिक्य 2602
अभिषेक वसंत कदम (शिवसेना उबाठा) – 1386
रंजन सदानंद शिरगांवकर (मनसे) – 242
प्रणय मनोहर चांदोस्कर (अपक्ष) – 90
मंगेश धर्मराज जाधव (वंचित बहुजन आघाडी) – 85
पंचायत समिती मतदार संघ : ३२ तळवडे (अनुसूचित जाती महिला)
एकूण मते – 2925 ; नोटा – 142
विजयी उमेदवार : सलोनी संतोष तळवडेकर (शिवसेना) – 2208 मताधिक्य 1633
मयुरी मंगेश जाधव (काँग्रेस) – 575
पंचायत समिती मतदार संघ : ३३ किंजवडे (सर्वसाधारण महिला)
एकूण मते – 3685 | नोटा – 82
विजयी उमेदवार : स्नेहा श्रीकृष्ण अनभवणे (भाजप) – 2752 मताधिक्य 1901
निकीता नारायण दाभोळकर (मनसे) –
जिल्हा परिषद मतदार संघ : १८ कुणकेश्वर (ना.मा.प्र)
एकूण मते – 7358 | नोटा – 138
विजयी उमेदवार : सुनिल बाळकृष्ण पारकर (भाजप) – 4929 मताधिक्य 2638
गणेश जगदीश गांवकर (शिवसेना उबाठा) – 2291
पंचायत समिती मतदार संघ : ३५ मुणगे (सर्वसाधारण)एकूण मते – 3790 ; नोटा – 90
विजयी उमेदवार : सदाशिव पुरुषोत्तम ओगले (भाजप) – 2841 मताधिक्य 1982
दीपक नारायण कदम (शिवसेना उबाठा) – 859
पंचायत समिती मतदार संघ : ३६ कुणकेश्वर (सर्वसाधारण)एकूण मते – 3568 ; नोटा – 89
विजयी उमेदवार : अमोल विजय लोके (शिवसेना) – 2019 मताधिक्य 559
गणेश गोपाळ वाळके (शिवसेना उबाठा) – 1460
