अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

३० डिसेंबरला निवडणूक ३१ डिसेंबरला मतमोजणी

*⚡ओरोस ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच पक्ष्यांसाठी महत्व मानली जाणारी जिल्हा बँकेची निवडणूकचा कार्यक्रम अखेर जाहीर झाली आहे.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता 30 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे तर जिल्हा बँकेत निवडणुकीतीची मतमोजणी ३१डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानुसार आज पासून म्हणजेच २९नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. सिंधुदुर्गातील राजकारणाच्या दृष्टीने तसेच भाजप आणि महा विकास आघाडीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या करता ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असणार आहे .महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपचा सामना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे परंतु कालच काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चारही नगरपंचायत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करण्यात आली असून मात्र जिल्हा बँकेबाबत कोणताही निर्णय न झाल्याने महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी 3 पक्ष की,काँग्रेस स्वबळावर लढणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी की काँग्रेस स्वबळावर लढून या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकणार?असा प्रश्न आहे. गेल्या सहा महिन्याहून अधिक काळ जिल्हा बँकेसाठी सर्वच पक्षांकडून आपापल्या परीने रणनीती आखली जात आहे.मात्र वारंवार निवडणूक लांबणीवर पडत असल्याने सर्वांची उत्सुकता ताणलेली असतानाच अखेर आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निवडणुकीचे बिगुल वाजले.

You cannot copy content of this page