ऐतिहासिक भरतगडावर “जागतिक वारसा सप्ताह साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आणि रत्नागिरी राज्य पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

*⚡सावंतवाडी ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भरतगडावर सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आणि सहाय्यक संचालक रत्नागिरी (राज्य पुरातत्व विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक वारसा सप्ताह’ साजरा करण्यात आला. ऐतिहासिक स्थळ भ्रमंती व गड स्वच्छता मोहीम राबवून हा जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात दुर्गसेवक सुनील मनोहर राऊळ, रामचंद्र जगन्नाथ आईर आणि इतर दुर्गसेवक सहभागी झाले होते. राज्यातील इतर १० किल्ल्यावरही जागतिक वारसा सप्ताह राबविण्यात आला. हा उपक्रम अजून मोठा करण्याचा तसेच लवकरच नवीन उपक्रमासोबत संवर्धन मोहिमा राबविण्याचा आपला मानस असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले.

You cannot copy content of this page