*⚡कणकवली ता.२९-:* शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकताच ऑनलाईन माध्यमातून जिल्हास्तरीय (सिंधुदुर्ग जिल्हा) कला उत्सव संपन्न झाला. या कलाउत्सवात खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथील इयत्ता अकरावी कला शाखेचा विद्यार्थी कु.हरिदास गणेश घेवडे याने शास्त्रीय संगीत – पखवाज वादन मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून घवघवीत यश संपादित केले. त्यामुळे त्याची राज्यस्तरीय कला मोहोत्सवासाठी निवड झाली आहे. कु.हरिदास घेवडे या विद्यार्थ्याची दि.१ते ३ डिसेंबर २०२१ या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड झाल्यामुळे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे ,सेक्रेटरी महेश कोळसुलकर व सर्व संचालक मंडळ यांनी विशेष अभिनंदन केले आहे.तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश आकिवटे सर,पर्यवेशक संजय सानप व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सुयशप्राप्त विद्यार्थी कु. हरिदास घेवडे याला शाळेचे संगीत शिक्षक श्री. संदिप पेंडूरकर सर व सहायक शिक्षक श्री.मारुती मेस्त्री सर व श्री. महेश सावंत सर यांचे विशेष असे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
राज्यस्तरीय कला उत्सवासाठी खारेपाटण ज्युनिअर कॉलेजच्या हरिदास घेवडेची निवड
