*⚡वेंगुर्ला ता.२९-:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, शाखा वेंगुर्ला तालुका, शहर शाखा, दलित सेवा मंडळ वेंगुर्ला व सावित्रीबाई महिला मंडळ वेंगुर्ला, यांच्या संयुक्त विद्यमाने समाज मंदिर आनंदवाडी येथे संविधान दिन व क्रांतीसुर्य महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सुभाष जाधव यांनी संविधान दिनाचे महत्व सांगितले तसेच महात्मा फुले यांच्या जीवनातील घडलेल्या घटना कथन केल्या. तर प्रेमानंद जाधव यांनी फुले यांच्या जीवनावर विचार मांडले. यावेळी गजानन जाधव, सखाराम जाधव. वामन कांबळे, जयंत जाधव, मुन्ना जाधव, राजन कांबळे, सुरेश जाधव, नागसेन वेंगुर्लेकर, संयोगिता जाधव, सरोजिनी जाधव, तेजल जाधव, वैशाली जाधव, मोनाली जाधव, अमिता जाधव, सुवर्णा जाधव. मंदिरा जाधव, जिद्दी जाधव, दिपीका जाधव यांच्यासह अन्य ज्ञातीबांधव उपस्थित होते. गौतम जाधव यांनी सूत्रसंचालन तर विठ्ठल जाधव यांनी आभार मानले.
आनंदवाडी येथे संविधान दिन संपन्न
