उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक सूर्यकांत आटेलकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

स्वतःचा गाडीने गोवा येथे जात केले रक्तदान…

*⚡सावंतवाडी ता.२९-:* येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षारक्षक असणारे सूर्यकांत आडेलकर यांनी स्वतः च्या गाडीने म्हापसा येथे जाऊन रक्तदान करत माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहे. गोवा येथील भाग्योदय रुग्णालयात गर्भ पिशवीच्या ऑपरेशन साठी ओ निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. परंतु, गोवा येथे रक्त न मिळाल्याने त्यांनी युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी या दुर्मिळ रक्तगट उपलब्ध करून दिला. सूर्यकांत आटेलकर यांनी गोवा येथे जाऊन रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तसेच यावेळी रक्तदाता उपलब्ध करून दिल्याने त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी देव्या सूर्याजी आणि मंगेश तळवणेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page