सतीश सावंत यांनी केले स्वागत
*⚡कणकवली ता.२९-:* कणकवली तालुक्यातील हुंबरठ ग्रामपंचायत सदस्य राणे समर्थक तथा भाजप कार्यकर्ते संदीप होळकर याच्या समवेत अनंत जाधव, संदीप नलावडे, अशोक नलावडे व कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हातात शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी सभापती संदेश पटेल, नगरसेवक कन्हैया पारकर, विधानसभा अध्यक्ष सचिन सावंत, बंडू ठाकूर, महेंद्र डीचवलकर, राजू ढवण, तात्या निकम व पदाधिकारी उपस्थित होते.
