कणकवली महाविद्यालयात भारतीय संविधान दिनानिमित्त व्याख्यान
*⚡कणकवली ता.२९-:* देशात सामाजिक शैक्षणिक व आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधान महत्त्वपूर्ण ठरले आहे. संविधानामुळे समस्त नागरिकांना शिक्षण मिळाले व सर्वांगीण विकासाची संधी मिळाली. सर्व नागरिकांनी संविधाना कडून मिळालेले अधिकार याबरोबरच नागरिकांची कर्तव्य याचीही अंमलबजावणी करायला हवी,संवैधानिक मुल्य जपली तरच भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही अबाधित राहील असे स्पष्ट प्रतिपादन संविधानाने अभ्यासक व विचारवंत प्रा. डॉ.अनंत राऊत यांनी केले. कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना व स्टाफ अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संविधानाने आम्हाला काय दिले’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख डॉ.लालासाहेब घोरपडे उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. अनंत राऊत, हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.लालासाहेब घोरपडे, स्टाफ अकादमीचे प्रमुख प्रा. भिकाजी कांबळे, पर्यवेक्षक मंगलदास कांबळे चौगुले उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.लालासाहेब घोरपडे म्हणाले की, संविधान म्हणजे समस्त भारतीयांना मिळालेली एक देणगी आहे. लोकशाही बळकट होण्यासाठी संविधानाचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सुरेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ अकादमी व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी केले. याप्रसंगी ११० विद्यार्थी व वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापकवॢंद उपस्थित होते. शेवटी आभार प्रा भिकाजी कांबळे यांनी मानले.