Headlines

जातीच्या दाखल्यांबाबत गाबित समाजाला न्याय देण्याची शासनाकडे मागणी

मालवण ता.०३-:* जात पडताळणी आणि जातीचे दाखले मिळवण्यासाठी गाबित समाज बांधवांना येत असलेल्या अडचणींबाबत तांत्रिक मार्गदर्शनासाठी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांसमवेत देवगड, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथे बैठक आयोजित करण्यात यावी. यासंदर्भात महसूल आणि जात पडताळणी विभागाने संयुक्तपणे लवकरात लवकर कार्यवाही करून गाबित समाजातील लोकांवर होत आसलेला अन्याय दूर करावा, अशी मागणी मालवण तालुका गाबित…

Read More

भावी काणेकर हिच्या पहिल्या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कणकवली ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या भावी काणेकर हिच्या पहिल्या विथइन द वॉलस ऑफ माय माईंड या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई येथे व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, डॉ. वैशाली वावीकर यांच्या हस्ते आणि रसिकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या काव्यसंग्रहाचे कौतुक करण्यात आले.  भावी काणेकर ही मालवण तालुक्यातील तळगाव येथील असून तिच्या या कविता लेखनासाठी आई वडिलांसह शिक्षकांनीही प्रोत्साहन दिले…

Read More

कॉन्स्टेबल संदीप राठोड यांना महासंचालक पदक महाराष्ट्र दिनी वितरण

वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग पोलिस दलात उल्लेखनीय काम केल्याबद्दल वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांचा पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मान करण्यात आला. १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून ओरोस येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संदीप राठोड यांना सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी…

Read More

मालवण येथे 15 वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

एम्. क्रिकेट ॲकॅडमीचे आयोजन : 4 मे ते 10 मे पर्यंत रंगणार स्पर्धा *⚡सावंतवाडी ता.०३-:* येथील एम् क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने १५ वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा मालवण बोर्डींग मैदानावर ४ मे ते १० मे पर्यंत होणार आहे . या एम् क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने आयोजित १५ वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन…

Read More

व्यापारी पतसंस्थेकडून उद्यमशील महिलांसाठी सुवर्णालंकार खरेदी कर्ज योजना

मालवण ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार उदिमात कार्यरत असणाऱ्या उद्यमशील महिलांना त्यांच्या आवडीचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी व्यापारी पतसंस्थेतर्फे महिलाप्रधान सुवर्णालंकार खरेदी कर्ज योजना अक्षय्य तृतियेपासून सुरू करण्यात, येत आहे. प्रायोगिक तत्वावर येत्या वटपौर्णिमेपर्यंत म्हणजे १४ जूनपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. या कर्ज योजनेंतर्गत फक्त व्यापारउदिम करणाऱ्या महिलांनाच दागिने खरेदीसाठी अधिकतम १ लाख रुपयांपर्यंतचा पतपुरवठा…

Read More

कणकवलीत श्री बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी

कणकवली ता.०३-:* कणकवली शहरात अक्षय तृतीयेच्या महूर्तावर लिंगायत समाजाचे आराध्य दैवत श्री .बसवेश्वर महाराज यांची जयंती प्रतिवर्षी प्रमाणे साजरी करण्यात आली. मंगळवारी कांबळे गल्ली येथील नियोजित लिंगायत समाज मंदिर जागेत श्री .बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात व विधिवत धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.जिह्यातील शासकीय कार्यालयात श्री .बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले….

Read More

अर्चना घारे यांनी राष्ट्रवादी नेते, नगरसेवक अबिद नाईक यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

*⚡कणकवली ता.०३-:* सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अर्चना घारे यांनी राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अबिद नाईक यांना निवासस्थानी भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे,माजी उपसभापती कुडाळ आर. के. सावंत,माजी सरपंच आकेरी संदीप राणे उपस्थित होते. यावेळी अर्चना घारे यांनी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकावार पक्ष बळकट करण्यासाठी…

Read More

बुद्धिबळ स्पर्धांमध्ये मुक्ताई ॲकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

कर्नाटक-हुबळी येथील सदगुरु चेसमार्ट्ज ॲकॅडमीचे आयोजन सावंतवाडी ता.०३-:* कर्नाटक-हुबळी येथील सदगुरु चेसमार्ट्ज ॲकॅडमीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय “रॅपिड” व “ब्लिट्ज” या दोन बुद्धिबळ स्पर्धांमध्ये येथील मुक्ताई ॲकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारीतोषिके मिळविली सतरा वर्षिय राष्ट्रीय खेळाडू कु. बाळकृष्ण पेडणेकर याने राष्ट्रीय रॅपिड बुदधिबळ स्पर्धेत नऊ राऊंड्समध्ये पाच विजय मिळवत आणि दोन राऊंड बरोबरीत सोडवत…

Read More

दारुम माळवाडीच्या वळणावर झालेल्या अपघातात दोघे गंभीर

कणकवली ता.०३-:* कासार्डे विजयदुर्ग रोडवर ओझरम फाट्याच्या पुढील वळणावर मोटर सायकल व फोर व्हीलर याच्या मध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कणकवली या ठिकाणी पुढील उपचारासाठी ताबडतोब हलविण्यात आले आहे. या बाबतप्रत्यक्ष घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,मुटाट हुन घाडी आडनावाचे दोन युवक आपल्या होंडा या गाडी वरून…

Read More

इन्सुलीत अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बांदा ता.०३-:* इन्सुली तपासणी नाक्याजवळ उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या दारूची इनोव्हा कारमधून अवैध वाहतूक करताना केलेल्या कारवाईत ४ लाख ५१ हजार २०० रुपयांच्या दारुसह एकूण ११ लाख ५१ हजार २०० रुपयांंचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कणकवली येथील चेतक भरत वाळवे (२५, रा. तिवरे) याला ताब्यात घेण्यात आले. कारमधून गोवा बनावटीच्या दारूचे ६१ बॉक्स जप्त…

Read More
You cannot copy content of this page