विविधारंगी कार्यक्रमांनी आरती प्रभूंचे स्मरण
वेंगुर्ला प्रतिनिधी– अथांग सागराच्या उसळणा-या समोर लाटा, उन्हात चमचम करणारी पांढरी शुभ्र वाळू आणि झुळझुळणारा वारा अशा जादूई निसर्गाच्या सान्निध्यात वायंगणी येथील डॉ. किर्लोस्कर बंगल्यात चिंत्र्यं खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या साहित्यावर ‘गाज‘ हा विविधरंगी कार्यक्रम रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न झाला. वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाने आरती प्रभूंच्या साहित्यावर ‘गाज‘ नावाचा विविधरंगी कार्यक्रम आयोजित केला…
