भरधाव वेगाने गाडी चालवून टेम्पो चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कॅलिस गाडी चालकावर गुन्हा दाखल…

देवगड ता.०९-: देवगड हुन नांदगाव च्या दिशेने भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन चालवून नांदगाव होऊन देवगडच्या दिशेने येणाऱ्या झीप टेम्पो (टाटा एक्सल) या वाहनाला समोरन धडक देऊन त्यात टेम्पो चालक दिलावर गणी अत्तार वय (५० ) राहणार मनेरमार ता. करवीर जि. कोल्हापूर यांना गंभीर व किरकोळ दुखापत करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी कॅलिस गाडीचे चालक ओंकार संजय राणे(२७) रा. ठाणे यांच्यावर देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अरमान दिलावर अत्तार यांनी देवगड पोलीस स्थानकात रीतसर फिर्याद दाखल केली आहे.सदरची घटना ८ मे रोजी रात्रौ ११.३० च्या सुमारास वरेरी मानमोडा या ठिकाणी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव हुन देवगड कडे येणाऱ्या एम एच ०९ इएम.६४१५ या झिप टेम्पो (टाटा एक्सएल )या वाहनास एम एच ०४ बीएस०७२४ गाडीच्या चालकाने भरधाव गाडी चालून समोरून धडक दिली. या धडकेत जीप टेम्पो चालक यांना किरकोळ व गंभीर दुखापत होऊन त्यात ते मयत झाले .या घटनेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून पोलीस चालक ओंकार संजय राणे यांच्यावर भादवी कदम ३०४,(अ) २७९,३३७,३३८ मोटर वाहन ऍक्ट १८४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करीत आहेत.

You cannot copy content of this page