Headlines

भाजीविक्रेत्यांसंदर्भात स्टंटबाजी करण्यापेक्षा वाद मिटवा

आम. नितेश राणे यांना नगरसेवक सुशांत नाईक यांचा टोला कणकवली ता.१३-:* आमदार नितेश राणेंनी नगरपंचायत मध्ये भाजीविक्रेत्यांसंदर्भात बैठक घेऊन स्टंटबाजी करण्यापेक्षा त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यात असलेला भाजीमार्केटचा वाद मिटवावा. आणि नगरपंचायतच्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांना नियमानुसार जागा उपलब्ध करून द्यावी. असा टोला कणकवली नगरपंचायत नगरसेवक तथा…

Read More

अखेर “त्या” वनपालावर कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल…

जयंत बरेगार यांनी केली होती तक्रार… सावंतवाडी ता.१३-:आर्थिक फायद्यासाठी शासकीय पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्र तयार करून वरिष्ठांची दिशाभूल करत बदली पास केल्याप्रकरणी माणगाव वनपाल यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयंत बरेगार यांनी तक्रार दाखल केली होती.

Read More

किरात शताब्दीनिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तिचा होणार सन्मान

वेंगुर्ला ता.१३-:* शताब्दी वर्षाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिचा १४ मे रोजी होणा-या ‘शताब्दी स्नेहमेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ‘भाव अंतरीचे हळवे‘ फेम मयुर गवळी, दशावतारातील पहिली महिला पखवाज वादक भाविका खानोलकर, साहित्य आणि तरुण संपादक क्रांती गोडबोले, रानमाणूस प्रसाद गावडे, पर्यटनामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणारे प्रतिक गावडे, स्टोन आर्ट कलाकार ऋतिका…

Read More

वेंगुर्लेत १५ रोजी आरोग्य तपासणी

वेंगुर्ला ता.१३-:* डॉ.गुप्ता दि. १५ मे रोजी स.११ वा. रामेश्वर मंदिरसमोर, आंबार्डेकर यांच्या घरी नाडी परीक्षण व आयुर्वेद पद्धतीने रुग्णांची तपासणी करतील. हृदयरोग, मधुमेह, हॅड्रोसीन, मूळव्याध, सर्दी-खोकला व जुने आजार असणा-यांनी आपली तपासणी करुन घ्यावी. नावनोंदणी ९४२३३०२११५ किवा ९४२२८७०६८२ यावर करावी.

Read More

कंत्राटी कामगारांना सेवेत हजर करणार

मुख्याधिकारी डॉ. सोंडगे यांचे आश्वासन वेंगुर्ला ता.१३-:* कंत्राटी कामगारांबाबत स्वतंत्र म्युनिसिपल कामगार संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली असून यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर येत्या काही कालावधीत सफाई कर्मचा-यांना कामावर हजर करुन घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी डॉ.अमिकुमार सोंडगे यांनी दिले. दि.२ मे २०२२ रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेने कंत्राटी कर्मचा-यांना टेंडर संपल्याने अचानक सफाई व इतर कर्मचा-यांना काम बंद…

Read More

वडाचापाट समाजमंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मालवण ता.१३-:* तथागत गौतम बुद्ध व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा वडाचापाट, सिद्धार्थ मंडळ वडाचापाट यांच्यावतीने व जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने १६ मे रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वडाचापाट समाजमंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिरात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे,…

Read More

गोळवण येथील स्पॉटलाईट फाउंडेशनचा १७ रोजी वर्धापन दिन

मालवण ता.१३-:* शैक्षणिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गोळवण येथील स्पॉटलाईट फाउंडेशन या संस्थेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार १७ मे रोजी गोळवण समतानगर येथील सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम होणार आहेत. यात ९ वाजता महापुरुषांना अभिवादन, प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत, ९.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय गोळवण येथे…

Read More

ठेकेदारामुळे प्रभाग ४ मधील रस्ता डांबरीकरण रखडले

माजी नगरसेवक राजू बेग यांचा आरोप सावंतवाडी ता.१३-:* शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रस्ता दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक राजू बेग यांनी केला असून, ठेकेदाराने या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी खड्ड्यात भरण्यासाठी टाकण्यात आलेले चिरे खड्डी काढून रस्ता डांबरीकरण करण्यासाठी साफ करण्यात आला होता. परंतु, त्या रस्त्याची साफसफाई केल्यानंतर अजूनही त्या…

Read More

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय 14 व 15 रोजीही सुरू

सिंधुदुर्गनगरी ता.१३-:* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणारे विविध पुरस्काराबाबतचे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 मे आहे. हे अर्ज स्वीकारण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग हे सुट्टीच्या दिवशी 14 व 15 मे रोजी कार्यालय कार्यालयीन वेळेत सुरू राहणार असल्याचे दीपक घाटे ,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ,सिंधुदुर्ग यांनी कळवले आहे.

Read More

जल्लोष 2022 अंतर्गत बोट वल्हवण्याची स्पर्धा संपन्न

सिंधुदुर्गनगरी ता.१३-:* मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्‍सव जल्‍लोष 2022 अंतर्गत दांडी समु्द्रकिनारी गुरुवार दि. 12 मे 2022 रोजी नौकानयन स्‍पर्धा अंतर्गत 18 फुट फायबर बोट व्‍हलवण्‍याची स्‍पर्धा घेण्‍यात आली. पर्यटक व स्‍थानिक मच्छिमारांनी नौकानयन स्‍पर्धेचा थरार अनुभवला. स्‍पर्धेच्‍या निमित्‍ताने मच्छिमारांनी आपले नौकानयन कौशल्‍य आणि ताकद पणाला लावून सर्वांचीच वाहवा मिळवली. या स्‍पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक एस.एस….

Read More
You cannot copy content of this page