गोळवण येथील स्पॉटलाईट फाउंडेशनचा १७ रोजी वर्धापन दिन

मालवण ता.१३-:* शैक्षणिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गोळवण येथील स्पॉटलाईट फाउंडेशन या संस्थेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार १७ मे रोजी गोळवण समतानगर येथील सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम होणार आहेत. यात ९ वाजता महापुरुषांना अभिवादन, प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत, ९.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय गोळवण येथे पाचवी ते सातवीसाठी निबंध स्पर्धा, १०.३० वाजता सर्वसमावेशक अभ्यास परीक्षा (गट १ – आठवी ते दहावी, गट २ – अकरावी ते पदवीधर) तसेच दुसरी ते चौथी व पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी सांघिक व मैदानी खेळ घेण्यात येणार आहेत. सांस्कृतिक भवन येथे दुपारी ३ वाजता मनोरंजनपर खेळ, सायंकाळी ४ वाजता महिलांच्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ९ वाजता बक्षीस वितरण, शिष्यवृत्ती प्रदान व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

You cannot copy content of this page