वडाचापाट समाजमंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मालवण ता.१३-:* तथागत गौतम बुद्ध व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा वडाचापाट, सिद्धार्थ मंडळ वडाचापाट यांच्यावतीने व जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने १६ मे रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वडाचापाट समाजमंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या शिबिरात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा वडाचापाट व सिद्धार्थ मंडळ वडाचापाट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page