माजी नगरसेवक राजू बेग यांचा आरोप
सावंतवाडी ता.१३-:* शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रस्ता दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक राजू बेग यांनी केला असून, ठेकेदाराने या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी खड्ड्यात भरण्यासाठी टाकण्यात आलेले चिरे खड्डी काढून रस्ता डांबरीकरण करण्यासाठी साफ करण्यात आला होता.
परंतु, त्या रस्त्याची साफसफाई केल्यानंतर अजूनही त्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नसून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. याबाबत बांधकाम विभागात चौकशी केली असता, हे काम सुरू केल्याची आपल्याला माहीत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता काम सुरू करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे माजी नगरसेवक राजू बेग यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
