किरात शताब्दीनिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तिचा होणार सन्मान

वेंगुर्ला ता.१३-:* शताब्दी वर्षाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिचा १४ मे रोजी होणा-या ‘शताब्दी स्नेहमेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे.

यामध्ये ‘भाव अंतरीचे हळवे‘ फेम मयुर गवळी, दशावतारातील पहिली महिला पखवाज वादक भाविका खानोलकर, साहित्य आणि तरुण संपादक क्रांती गोडबोले, रानमाणूस प्रसाद गावडे, पर्यटनामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणारे प्रतिक गावडे, स्टोन आर्ट कलाकार ऋतिका पालकर, सामाजिक बांधिलकी जोपासणारी मृणालिनी देसाई आणि वेंगुर्ला तालुक्याच्या आरोग्य, पर्यटन, शिक्षण आणि पर्यावरण यासाठी सातत्याने कार्यरत असणारी ‘माझा वेंगुर्ला‘ संस्था यांना ‘प्रेरणा पुरस्कार‘ तर पत्रकारीतेसोबत बालदशावतार चळवळीला प्रोत्साहन देणारे आणि भजनी मंडळात सक्रीय असणारे प्रथमेश गुरव यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कारा‘ने सन्मानीत तसेच साहित्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करुन नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणा-या वृंदा कांबळी, ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि जे.जे.स्कूल ऑफ आर्टसचे निवृत्त प्राध्यापक सुनिल नांदोस्कर यांना कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला वाचक, हितचितक आणि रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ‘किरात‘ परिवारातर्फे केले आहे. फोटो – मयुर गवळी, भाविका खानोलकर, क्रांती गोडबोले, प्रसाद गावडे, ऋतिका पालकर, मृणालिनी देसाई, प्रथमेश गुरव, वृंदा कबळी, अरुण दाभोलकर, दिलीप गिरप, सुनिल नांदोस्कर

You cannot copy content of this page