Headlines

अंमली पदार्थांविरोधात २७ रोजी बैठकीचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.२५-:* सिधुदुर्ग जिल्ह्यासह वेंगुर्ला तालुक्यातही अंमली पदार्थांची तस्करी, वाहतुक आणि सेवन यात वाढ झालेली आहे. याकडे विशेष लक्ष घालून उपाययोजना केली नाही तर युवा पिढी भविष्यात बरबाद होऊ शकते. तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी अंमली पदार्थांच्या विरोधात सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. हा लढा सशक्त करण्यासाठी याला पाठबळाची गरज आहे, यासाठी २७ मे रोजी…

Read More

अनंत पिळणकर यांचा गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भास्कर भूषण पुरस्काराने होणार सन्मान

कणकवली ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेली तीन दशके विविध पदांवर कार्यरत असलेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अल्पावधीत जिल्ह्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे अनंत पिळणकर यांना भास्कर भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन कडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराने अनंत पिळणकर यांना शनिवारी गोवा येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…

Read More

युवापिढीला व्यवसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रबोधनाची गरज

*⚡वेंगुर्ला ता.२४-:* समाजपरिवर्तनामध्ये युवापिढीचा सहभाग आवश्यक आहे. तरच विकासाचे स्वप्न साकार होऊ शकते. परंतु, आज युवापिढी काही प्रमाणात व्यसनाच्या दिशेने जाताना दिसत आहे, ते थांबविण्याकरीता युवापिढीमध्ये याविषयी प्रबोधन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सिधुदुर्ग जिल्हा युथ संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीनिवास गावडे यांनी केले. युवापिढी अंमली पदार्थ सेवन करीत असल्याचे वृत्त समोर येत आहे, अशावेळी पालकांनी जागृत राहण्याची…

Read More

उपअधिक्षक भूमी अभिलेख सर्व्हेअर, ट्रेसर व लिपिक कर्मचारी नेमणूक करण्यात यावी

संचालक भुमी अभिलेख यांच्याकडे परशुराम उपरकर यांची मागणी कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक भूमी अभिलेख सर्व्हेअर व ट्रेसर आणि लिपिक कर्मचारी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख पुणे यांच्याकडे केली आहे. निवेदनात परशुराम उपरकर म्हणतात,जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्याने आपण व आपले उपआयुक्त…

Read More

मनसेने माजगाव ते मळगाव रस्ता काम रोखले

निकृष्ट काम लपविण्यासाठी रस्त्यावर टाकली खडीची पावडर;उप तालुकाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा आरोप:मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा दिला इशारा सावंतवाडी ता.२५-:* माजगाव ते मळगाव बाजारपेठ पर्यंतच्या रस्त्याचे काम पुन्हा का करण्यात आले असा सवाल मनसे उप तालुकाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी करण्यात आलेले या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते, ते काम लपविण्यासाठी रस्त्यावर खडीची…

Read More

नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांचे उपोषण स्थगित

कणकवलीत प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले लेखी आश्वासन कणकवली ता.२५-:* नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यासाठी सर्वपक्षीय ग्रामस्थांनी साखळी उपोषण प्रांतकार्यालयासमोर छेडले.त्यावर प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी सर्व्हिस रस्ता खुला करण्यासाठी गतीने काम सुरु आहे.नलावडे कुटूंबियांना लेखी पत्र आजच देत आहोत,की वाढीस जमीन नोटीस बजावली आहे, आता बांधकाम मोबदल्याबद्दल निवाडा तयार करुन महामार्ग प्राधिकरणला पाठवला असून मंजुरी…

Read More

स्ट्रीट फूड वेंडोर प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या खाद्याचे प्रदर्शन

राणी पार्वतीदेवी स्कूलचे मुख्याध्यापक नाईक यांनी केले उद्घाटन सावंतवाडी ता.२५-:* प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक सिंधुदुर्ग यांच्या वतीने किमान कौशल्य विकास जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण) मार्फत एस एस आय कॉम्प्युटर सावंतवाडी येथील स्ट्रीट फूड वेंडोर हा कोर्स यशस्वी रित्या पूर्ण करून स्वयंरोजगार सुरू केलेल्या यशस्वी विद्यार्थ्या मार्फत बनविण्यात…

Read More

गोगटे-जोगळेकर कॉलेज रत्नागिरी मार्फत टॅलेन्ट सर्च परिक्षेचे आयोजन

*नमस्कार🙏 प्रिय विद्यार्थी व पालक,* 🔴 *गोगटे-जोगळेकर कॉलेज रत्नागिरी मार्फत टॅलेन्ट सर्च परिक्षेचे आयोजन*🔴 *ही परीक्षा कोण देऊ शकतो?* 👉 *ज्या विद्यार्थांनी या वर्षी दहावी ची परीक्षा दिली आहे आणि ज्यांना इंजिनिअर किंवा मेडिकल क्षेत्रात करियर करावयाचे आहे ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.* 👉 *मराठी, सेमी व इंग्लिश मीडियम मधील कोणीही विद्यार्थी ही परीक्षा…

Read More

सफाई कर्मचाऱ्यांच्या चाळीचे तातडीने छप्पर दुरुस्ती करा…

माजी उपनगराध्यक्ष गोविंद उर्फ तानाजी वाडकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी राहत असलेल्या एका चाळीचे छप्पर पूर्णपणे जीर्ण झाले असून, त्या चाळीत राहणारे सफाई कर्मचारी राजन कदम यांच्या खोलीच्या छपराचा काही भाग गेल्यावर्षी पावसात मोडला होता. यावेळी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्याला टेकू लावून तात्पुरती डागडुजी केली होती. परंतु, यावर्षीच्या पहिल्याच पावसात…

Read More

शिरोडा समुद्रात बुडालेल्या वेत्ये येथील सुनिल गावकर चा मृतदेह सापडला

पोलीस घटनास्थळी दाखल वेंगुर्ले ता.२५-:* तालुक्यातील शिरोडा समुद्रात काल मंगळवारी बुडालेल्या वेत्ये येथील सुनिल देवू गावकर ( ४५) या तरुणाचा मृतदेह आज बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शिरोडा समुद्र किनारी आढळून आला. याबाबत ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे यांनी शिरोडा पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिरोडा समुद्रात आपल्या गावातील सहकाऱ्यांसोबत…

Read More
You cannot copy content of this page